चमेली फुल
महादेवाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते. महादेवाच्या कृपेने भक्ताला वाहन सुख मिळते.
पारिजात हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख-संपत्ती व समृद्धीचा वास असतो.
सारंगी फुल
वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी श्रावणामध्ये महादेवाला सारंगी फूल अर्पण करा. असे मानले जाते की, यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. विवाह जुळण्यात अपयश येत असल्यास यामुळे विवाहयोग जुळून येतो.
धोतऱ्याचे फुल
शिवाचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
मोगरा फुल
श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे फूल अर्पण करा. शिवाला शुभ्र मोगरा अर्पण करणे उत्तम. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. तसेच भगवंताला बेला पत्र अर्पण करा.
कणेर फुल
कणेरचे फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे. शिवलिंगावर कणेरचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडावर कमरेचे फुल वाहावे.
जुही फुल
जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धन-धान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही.
अळशीचे फुल
अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.