मृत अन् पितरांना स्वप्नात पाहणे शुभ की अशुभ? जाणून घ्या

झोपताना दिसणार्‍या स्वप्नांचा संबंध आपल्या आयुष्याशी कुठेना कुठेतरी नक्कीच असतो.
Nightmare
NightmareDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येकजण स्वप्ने पाहत असतो. झोपताना स्वप्न पाहणे ही एक समान क्रिया आहे पण कधी स्वप्ने चांगली असतात, काही स्वप्ने वाईट (Nightmare) असतात, तर काही स्वप्ने भीतीदायकही असतात. झोपताना दिसणार्‍या स्वप्नांचा संबंध आपल्या आयुष्याशी कुठेना कुठेतरी नक्कीच असतो. स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत दिसणारी स्वप्ने आपल्यासाठी चांगल्या आणि वाईट गोष्टी दर्शवतात, त्यामुळे त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. (Seeing the dead and ancestors in a dream is auspicious or inauspicious)

Nightmare
Parenting Tips: भारतीय पालकांच्या या वाईट सवयी मुलांचा विकासात आणतात अडथळा

स्वप्न विज्ञानात स्वप्नांचे विशेष महत्त्व सांगितले आहे तर अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत किंवा पूर्वज दिसून येतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नामध्ये मेलेले लोक येण्याने तुमची त्यांच्याशी आसक्ती दिसून येते, परंतु जर ते तुमच्या स्वप्नात वारंवार येत असतील तर त्याचा अर्थ गंभीर देखील असू शकतो. जाणून घेऊया स्वप्नात मृत आणि पितरांना पाहणे शुभ की अशुभ?

मृत व्यक्तींना पुन्हा पुन्हा पाहणे अशुभ स्वप्न

शास्त्रानुसार , मृत व्यक्तींना पुन्हा पुन्हा स्वप्नात पाहणे अशुभ लक्षण मानले जाते. तर असे मानले जाते की मृतांना शांती मिळाली नाही आणि ते शांततेच्या शोधात भटकत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांची विधिवत पूजा करावी तसेच घरामध्ये रामायण आणि गीता पठण करा.

पितरांना आनंदी पाहणे हे शुभ लक्षण आहे,

जर तुम्ही स्वप्नात पितरांना आनंदी होताना पाहत असाल तर ते शुभ लक्षण आहे. स्वप्न शास्त्रानुसार पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्यावर सदैव कृपा राहते तसेच पितरांच्या आशीर्वादाने सर्व अडचणींपासून मुक्ती मिळू शकते.

Nightmare
Coconut Flour Recipes: नारळाच्या पिठाने बनवा या मजेदार रेसिपी

दुःखी पितरांना पाहणे अशुभ असते,

जर स्वप्नात पितरांना रागामध्ये किंवा दुःखी दिसले तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार मृत व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पंडितांकडून घरी कथा करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com