सध्या एक मार्केटमध्ये अनेक नवीन फोन येत आहे.ज्यातील अनेक फोन हे ग्राहकांच्या पसंतीस येत आहे.त्यातच Apple आपला एक नवीन फोन घेऊन येत आहे.
Apple हे आपले 3 ऱ्या जनरेशन चे iPhone SE 5g मॉडेल लाँच करण्याची योजना तयार करत आहे. परंतू फोन लाँच करण्याआधीच यामध्ये असलेल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन संदर्भात अनेक अंदाज लावले जात आहेत. पण आता एका अहवालात दावा केला आहे की, iPhone SE 5g ( iPhone)याचे डिझाइन हे आयफोन 8 सारखे आहे. MacRumors च्या अहवालानुसार, येणारा 2022 iPhone SE 5G तंत्रज्ञान आणि त्याचे अपडेट A-सीरीझ चिप पेक्षा कमी असू शकते. पण त्याचे डिझाइन वेगळे असणार नाही.
असे म्हटल्या जात आहे की, iPhone SE हा 5G ला सपोर्ट करणारा SE-सिरीजचा पहिला iPhone असू शकतो. 2022 iPhone SE वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लॉन्च (launch) होईल आणि त्यात 3GB मेमरी असेल. तर पुढिल वर्षी म्हणजे 2023 iPhone SE मध्ये मोठ्या डिस्प्ले आणि 4GB मेमरीसह अधिक महत्त्वपूर्ण बदल दिसून येतील.
डिस्प्ले विश्लेषक रॉस यंग यांनी यापूर्वी सांगितले होते की,Apple 2022 मध्ये लॉन्च करण्यासाठी 5G कनेक्टिव्हिटीसह इतर नवीन 4.7-इंच iPhone SE वर काम करत आहे, त्यानंतर 2024 मध्ये 5.7-इंच ते 6.1-इंच एलसीडी डिस्प्ले असलेला iPhone SE मॉडेल येईल.
अहवालात असेही म्हटले आहे की iPhone XR किंवा iPhone 11 च्या डिझाइनसह iPhone SE दोन वर्षांनी म्हणजेच 2024 मध्ये येऊ शकतो. 2016 मध्ये पहिल्यांदा Apple iPhone SE सीरीज लॉन्च झाली होती तर त्याची दुसरी आवृत्ती ही 2020 मध्ये आली होती. 2020 मध्ये, Apple (apple) ने नवीन A13 बायोनिक आणि चिपसेट सोबत iPhone SE रीफ्रेश केले. तथापि, स्मार्टफोन डिस्प्लेच्या वरच्या आणि खालच्या बाजूला पातळ बेजलसह आला आहे, ज्यामध्ये आयकॉनिक टच आयडी देखील आहे.
काय असेल iPhone SE च्या नवीन मॉडेलमध्ये
जसे Apple ने iPhone SE 2020 नवीन इंटरनल सोबत रीफ्रेश केले, तेच iPhone SE 2022 सोबतही होऊ शकते. म्हणजेच iPhone SE 2022 मध्ये 5G सपोर्ट (support) सोबत येणार नवीन A-सिरीज प्रोसेसर जे की A14 किंवा A15 सारखे असेल. कदाचित नवीन रंग आणि रिफ्रेश केलेला कॅमेरा (camera) सेन्सर असतील. iPhone SE 2022 बद्दल अधिक माहिती ही स्मार्टफोनची लॉन्च ची तारीख जवळ आल्यावरच कळणार आहे. सर्वसाधारणपणे नवीन Apple iPhone सीरीज दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.