संकष्ट चतुर्थी व्रताचे मनोभावे पालन केल्याने होतील सर्व इच्छा पूर्ण; बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राशीनुसार करा 'हे' उपाय

Sankashti Chaturthi Vrat Tips: अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही मार्गी लागतात. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने, हा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.
zodiac remedies Sankashti
zodiac remedies SankashtiDainik Gomantak
Published on
Updated on

Sankashti Chaturthi Vrat: आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्ट चतुर्थीचे व्रत १४ जुलै २०२५ पाळले जात आहे. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. एवढेच नाही तर अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही मार्गी लागतात. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने, हा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणरायाला मोदकांचा नैवेद्य आणि काही फुले अर्पण केल्यास शिक्षणासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात, अशी श्रद्धा आहे. याशिवाय काही विशिष्ट उपाय केल्यास गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. हे उपाय तुम्ही तुमच्या राशीनुसार देखील करू शकता.

राशीनुसार करा हे विशेष उपाय

मेष रास: मेष राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला 'ॐ गजाननाय नमः' या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला मनोवांछित फळांची प्राप्ती होईल.

वृषभ रास: वृषभ राशीच्या जातकांनी गणेश चालीसाचे पठन करावी. याच्या प्रभावाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील.

मिथुन रास: मिथुन राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य अर्पण करावा. हा उपाय तुमच्या रखडलेल्या कामांना पूर्ण करण्यास मदत करेल.

कर्क रास: कर्क राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करताना 'ॐ प्रमुखाय नमः' या मंत्राचा जप करावा.

zodiac remedies Sankashti
Astrology in Marathi: रवी, मंगळ एकाच वेळी निर्बल; याचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

सिंह रास: सिंह राशीच्या लोकांनी भगवान गणेशाला पंचामृत अर्पण करावे. हा उपाय तुमच्यासाठी धनलाभाचे योग निर्माण करू शकतो.

कन्या रास: कन्या राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीला हिरव्या वस्तूंचे दान करावे. यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

तुळ रास: तुळ राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करताना त्यांना पिवळे चंदन लावावे. यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पांचा मधाने अभिषेक करावा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील.

धनु रास: धनु राशीच्या व्यक्तींनी 'ॐ भवात्मजाय नमः' या मंत्राचा जप करावा. यामुळे विवाहातील अडचणी दूर होतील.

मकर रास: मकर राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश चालीसा पाठ करावी. यामुळे जीवनात सुख-समृद्धी टिकून राहील.

कुंभ रास: कुंभ राशीच्या व्यक्तींनी गणपतीला दूर्वा घास अर्पण करावी. तसेच, हिरव्या वस्तूंचे दान करणेही तुमच्यासाठी शुभ राहील.

मीन रास: मीन राशीच्या व्यक्तींनी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करून, आपल्या राशीनुसार हे उपाय केल्यास तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होईल, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

(येथे दिलेली माहिती सामान्य श्रद्धा, ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथ इत्यादींवर आधारित आहे. येथे दिलेल्या माहितीच्या अचूकतेसाठी, पूर्णतेसाठी आणि तथ्यांसाठी दैनिक गोमंतक जबाबदार नाही.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com