Saffron Tea: 'या' लाल औषधी वनस्पतीपासून बनवलेला चहा प्या अन् राहा निरोगी

अनेक लोक दिवसाची सुरूवात चहाने करतात.
Saffron Tea
Saffron TeaDainik Gomantak

Saffron Tea: अनेक लोक दिवसाची सुरूवात चहाने करतात. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना सर्वात पहिली गोष्ट हवी असते ती म्हणजे चहा..! इतकंच नाही तर अनेकांना चहा इतका आवडतो की ते घरी किंवा ऑफिसमध्ये दर दोन तासांनी चहा पितात. चहा पिऊन थकवा दूर होतो पण चहाचे असतिसेवन आरोग्यासाठी घातक असतो. त्यामुळे तुम्ही चहा ऐवजी हर्बल टी पिऊ शकता. ज्यामध्ये ग्रीन टी, ब्लॅक टी इत्यादींचा समावेश होतो. 

Saffron Tea
Ganesh Chaturthi Special: गणेश चतुर्थीला 'या' गोष्टीं दान केल्यास गणरायाची राहील कृपादृष्टी

पण, आज आम्ही तुम्हाला अशा हर्बल चहाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे रोज सेवन केल्यास अनेक गंभीर आजार दूर राहतील. केशर चहा पिऊन तुम्याही अनेक आजारंपासून दूर राहू शकता. यामध्ये अनेक प्रकारच्या अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे आपल्याला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया केशर चहा प्यायल्याने कोणते फायदे होतात.

कॅन्सरवर फायदेशीर

जर तुम्हाला ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचा कंटाळा आला असेल तर आजपासूनच केशर चहा प्यायला सुरुवात करू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते केशरमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही केशर चहाचा आहारात समावेश केला तर तुम्ही अनेक गंभीर प्रकारच्या कॅन्सरपासून दूर राहू शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

केशर हे रिइबोफ्लेविनने समृद्ध आहे. हे व्हिटॅमिन बी चा एक प्रकार आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. इतकेच नाही तर केशर चहामध्ये सॅफ्रानल नावाचे अँटीऑक्सिडंट असते. जे शरीरात अँटीबॅक्टीरियल आणि अँटीव्हायरल सक्रिय करतात.

स्मरणशक्ती वाढते

केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन असे दोन मुख्य घटक असतात. हे दोन्ही घटक स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. जर तुम्हालाही तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर केशर चहा नक्की प्यावा.

Saffron Tea
Ganesh Chaturthi Special: गणेश चतुर्थीला 'या' गोष्टीं दान केल्यास गणरायाची राहील कृपादृष्टी

हानिकारक पदार्थांपासून संरक्षण

आरोग्य तज्ज्ञांच्या मते केशरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट शरीराला हानिकारक पदार्थांपासून वाचवण्यास मदत करतात. फ्लेव्होनॉइड हे वनस्पतींमध्ये आढळणारे रसायन आहे. जे बुरशी आणि रोगांपासून वाचवण्‍यात मदत करतात.

मासिक पाळीत होणार त्रास

केशरच्या सेवनाने प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमच्या लक्षणांची तीव्रता कमी होऊ शकते. जर तुम्हाला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमची समस्या असेल तर तुम्ही केशर चहाचे सेवन करू शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com