Cancer: महिलांनो, आता तरी सावध व्हा! पुरुषांपेक्षा कर्करोगाचा धोका 82 टक्क्यांनी वाढला? जाणून घ्या रिपोर्ट

Rising Cancer Rates In Young Women: गेल्या काही वर्षांत तरुण महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यातच, 50 वर्षांखालील महिलांना पुरुषांच्या तुलनेत कर्करोगाचा धोका 82 टक्क्यांनी वाढला आहे.
Cancer: महिलांनो, आता तरी सावध व्हा! पुरुषांपेक्षा कर्करोगाचा धोका 82 टक्क्यांनी वाढला? जाणून घ्या रिपोर्ट
Breast CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Cancer In Young Women: गेल्या काही वर्षांत तरुण महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यातच, 50 वर्षांखालील महिलांना पुरुषांच्या तुलनेत कर्करोगाचा धोका 82 टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या (American Cancer Society) अहवालानुसार, ही वाढ 2002 मध्ये पुरुषांपेक्षा 51 टक्के जास्त होती, ती 2021 मध्ये 82 टक्के एवढी झाली.

दरम्यान, या चिंताजनक आकडेवारीत स्तनाच्या कर्करोगाची देखील भर पडली आहे, ज्यामध्ये 2012 ते 2021 पर्यंत दरवर्षी 1 टक्क्यांनी वाढ झाली. 50 वर्षांखालील महिलांमध्ये (Women) दरवर्षी 1.4 टक्के वाढ दिसून येत आहे. या अभ्यासात रिस्क फॅक्टर्सला कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहेत, ज्यात वजन वाढणे आणि उशिरा गर्भधारणा होणे यांचा समावेश आहे.

Cancer: महिलांनो, आता तरी सावध व्हा! पुरुषांपेक्षा कर्करोगाचा धोका 82 टक्क्यांनी वाढला? जाणून घ्या रिपोर्ट
Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग का होतो? कारण, लक्षणे आणि उपचार

कर्करोगाचे प्रकार

दरम्यान, गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अभ्यासात गर्भाशयाच्या कर्करोगास "वाढता मृत्यूदर असलेल्या काही कर्करोगांपैकी एक" असे अधोरेखित केले आहे. 2013 ते 2022 पर्यंत, मृत्यूदर दरवर्षी 1.5 टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे, 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमाण दरवर्षी 2.4 टक्क्यांनी वाढले आहे, तर मृत्यूदर दरवर्षी 1 टक्क्यांनी वाढत आहे. 1990 च्या दशकाच्या मध्यापासून डायग्नोसिसच्या कर्करोगाचे निदान दरवर्षी 1 टक्क्यांनी वाढले असून मृत्यूदर देखील वाढत आहे.

तज्ञ काय सांगतायेत?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे रोगतज्ज्ञ आणि अहवालाचे प्रमुख रेबेका एल. यांनी सांगितले की, "हा ट्रेंड महिलांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसत आहे." सेगेल यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या धक्कादायक ट्रेंडविषयी सांगितले.

"काही कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्येही वाढत असले तरी, हा कल असमान आहे. महिलांमध्ये ही वाढ अधिक लक्षणीय आहे," असे मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील ऑन्कोलॉजिस्ट, एमडी, नील अय्यंगार यांनी सांगितले.

Cancer: महिलांनो, आता तरी सावध व्हा! पुरुषांपेक्षा कर्करोगाचा धोका 82 टक्क्यांनी वाढला? जाणून घ्या रिपोर्ट
Lung Cancer च्या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध

महिलांमध्ये कर्करोग वाढण्याची कारणे

खराब जीवनशैली, झोपेची कमतरता, धूम्रपान किंवा व्हेपिंग आणि मद्यपान, तसेच पर्यावरणीय घटक देखील कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com