Eating Fruit at Night: रात्री फळे खावीत का? फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? वाचा सविस्तर

Right Timing To Eat Fruits: जेवणानंतर फळे खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. यापेक्षा तुम्ही सायंकाळी स्नॅक म्हणून फळे घेऊ शकता.
Eating Fruit at Night: रात्री फळे खावीत का? फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? वाचा सविस्तर
Right Timing To Eat FruitsDainik Gomantak
Published on
Updated on

Right Timing To Eat Fruits

फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. वैद्यकीय तज्ञ नेहमीच फळे खाण्याचा आणि रस नियमितपणे पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, फळे कधी खावीत आणि कधी खाऊ नये याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अनेकजण रात्री फळे खावीत असे सांगतात तर काही लोक रात्री फळे खाणे हानिकारक असू शकते, असे म्हणतात.

कधी खावीत फळं? (Right Time To Eat Fruits)

सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे आरोग्यासाठी सर्वात चांगले असते असे, काही तज्ञ सांगतात. सकाळी उपाशी पोटी फळे खाल्ल्याने शरीरातील पचनक्रिया सक्रिय होते. तसेच, जेवण करण्यापूर्वी देखील तुम्ही फळे खाऊ शकता, यामुळे अन्न लवकर पचते.

तर, जेवणानंतर फळे खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. यापेक्षा तुम्ही सायंकाळी स्नॅक म्हणून फळे घेऊ शकता.

Eating Fruit at Night: रात्री फळे खावीत का? फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? वाचा सविस्तर
Sulakshana Sawant: आप खासदार संजय सिंग अडचणीत; गोवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल

कधी खाऊ नयेत फळं? (When Not To Eat Fruits)

रात्रीच्या वेळी फळे खाणे टाळावे. रात्री फळाचे सेवन केल्याने गॅस आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर जेवणानंतर लगेच फळे खाऊ नयेत. यामुळे पोटात जडपणा येऊ शकतो.

जर तुम्ही रात्री फळे खात असाल तर झोपण्याच्या तीन तास आधी फळे खाऊ शकता. आणि तुम्ही फळे खात असाल तर ताज्या आणि हंगामी फळांना प्राधान्य द्या. जास्त पिकलेली किंवा शिळी फळे खाऊ नयेत.

Eating Fruit at Night: रात्री फळे खावीत का? फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? वाचा सविस्तर
Suleman Khan: फरार सुलेमानचा Video कसा मिळाला? काँग्रेस नेते सुनील कवठणकरांची ओल्ड गोवा पोलिसांकडून 2 तास परेड

फळे खाण्याचे फायदे! (Benefits Of Eating Fruits)

फळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचाही सुधारते. त्यात जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात (इम्युनिटी बूस्टर फ्रूट्स). फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा पुरवते. ताजी फळे खाल्ल्याने एकूणच आरोग्य सुधारते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com