Relationship Tips: रिलेशनशिप वाटू लागलंय बोर? पूर्वीसारखं प्रेम परत मिळवण्यासाठी ट्राय करा या टिप्स

जर रिलेशनशीपमध्ये तुम्हाला बोर होत असेल तर काही सवयी बदलण्याची गरज आहे.
Relationship
RelationshipDainik Gomantak
Published on
Updated on

Love Tips: जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा अनेक समस्यांना आपण तोंड देत असतो. कधी चांगले तर कधी वाईट दिवसांना सामोरे जावे लागते. यामुळे एकमेकांवर विश्वास वाढत जातो किंवा कमी होतो. पण रिलेशनशिपमध्ये अनेक दिवस राहिल्यानंतर तुम्हालाही कंटाळा येत असेल आणि तुमच्या दोघांमध्ये पहिले सारखे प्रेम राहिलेले नाही असे वाटत असेल तर तुम्हाला काही सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे.

  • स्वतःसाठी वेळ काढा

जर तुम्ही स्वत:ला वेळ देत नसाल तर तुम्ही स्वत:ला आनंदी ठेऊ शकणार नाही. यासाठी स्वत:ne वेळ द्यावा. कारण तुम्ही आनंदी नसाल तर तुम्ही पार्टनरला आनंदी ठेऊ शकत नाही. यामुळे कधी कधी मित्रांसोबत फिरायला जावे किंवा एकटे फिरायला जावे. यामुळे तुम्हाला रिलेशनशिप बोर वाटणार नाही.

  • नातं हसतं-खेळतं ठेवावे

रिलेशनशिपमध्ये नेहमी मोकळेपणा असावा. एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर कराव्या. जास्त विचार न करता आपल्या पार्टनरला सर्व गोष्टी शेअर केल्यास तुम्हाला नातं जड किंवा बोर वाटणार नाही.

Relationship
Cooking Hacks: वीकेंडला मासे बनवण्याचा विचार करत असाल तर वाचा 'या' कुकींग टिप्स
love
loveDainik Gomantak
  • नवीन गोष्टींचा अभाव

तुम्ही जर नेहमी पार्टनरच्या म्हणण्यानुसार आयुष्य जगत असाल तर तुम्हाला असे नात बोर होऊ शकते. यामुळे तुम्ही काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करावे. यामुळे रिलेशनशिपमध्ये बोर होणार नाही.

  • छंद जोपासावा

तुम्हाला रिलेशनशिपमध्ये बोर वाटत असेल तर आपला छंद जोपासावा किंवा एकमेंकाना सरप्राइज देऊ शकता. लक्षात ठेवा कोणतेही नातं हे दोघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  • स्पेस द्यावा

कोणतेही नातं टिकून राहण्यासाठी विश्वास असणे गरजेचे असते.तसेच एकमेकांना स्पेस देणे देखील तेवढेच गरजेचे आहे. कारण यामुळे पार्टनरबद्दल ओढ वाढते. रिलेशनशिपमध्ये बोर व्हायचे नसेल तर एकमेकांना त्यांची स्पेस देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com