Cooking Hacks: वीकेंडला मासे बनवण्याचा विचार करत असाल तर वाचा 'या' कुकींग टिप्स

मासे बनवण्यापुर्वी ते स्वच्छ करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
cooking tips
cooking tipsDainik Gomantak

Cooking Hacks: जर तुम्हाला मांसाहार करायला आवडत असेल तर मासे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. कारण यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. जे तुमचे आरोग्य सुधारण्याचे काम करतात. पण ते घरी बनवायला आणि खाण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो. विशेषत: जेव्हा तुम्हाला ते बाजारातून कापून स्वच्छ केले जात नाही.
जर तुम्ही या वीकेंडला घरी मासे बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

  • हात चांगले धुवावे

अनेक प्रकारचे जिवाणू हातांना चिकटलेले असतात. त्यामुळे मासे योग्य प्रकारे स्वच्छ करण्यासाठी, सर्वात पहिले आपण आपले हात चांगले धुणे आवश्यक आहे. कमीत-कमी 20 सेकंद आपले हात धुतल्यानंतर आणि कोरडे केल्यानंतर मासे पाण्याने चांगले धुवावे.

  • माशाचे खवले कसे काढावे

मासे काही मिनिटे बर्फाच्या पाण्यात ठेवावे. यामुळे त्याची त्वचा सैल होईल. आता टिश्यू पेपरने मासे पुसल्यानंतर ते वर्तमानपत्रावर ठेवा आणि चाकूने शेपटीपासून डोक्यापर्यंत घासून घ्यावे. अशा प्रकारे माशांची कडक आणि तीक्ष्ण त्वचा निघुण जाईल. नंतर मासे पाण्याखाली धुवावे.

cooking tips
Good Habits: 'या' 6 सवयींमुळे आजारपण होईल दूर
  • मासे कसे कापावे

माशांचे सर्व भाग खाल्ले जात नाहीत. यामुळे ते काढण्यासाठी मासे कापावे लागतात. हे काम तुम्ही दुकानात करून घेऊ शकता. पण हे काम तुम्ही स्वतः करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात पहिले माशाचे डोके आणि शेपटीचा भाग कापून टाकावा. नंतर डोक्याच्या भागातून आतील कचरा बाहेर काढावा. नंतर माशाच्या मध्यभागी एक लांब कट करावे. लक्षात ठेवा की त्याचे दोन भाग होऊ नयेत.आता माशांचे सर्व अंतर्गत भाग गोळा करून वेगळे करा. नंतर त्याचे लहान तुकडे करून तुम्ही पदार्थ बनवू शकता.

  • माशांचा वास कसा कमी करावा

मासे शिजवण्यापूर्वी काही वेळ व्हिनेगरच्या पाण्यात भिजत ठेवावे किंवा हळद आणि मीठ टाकून झाकून ठेवावे. नंतर कोमट पाण्यात काही वेळ भिजवून ठेवावे. असे केल्याने, माशांमधील वास आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यानंतर तुम्ही ते तयार करून तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com