तुम्हाला सतत रील्स बघण्याची सवय आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Reels Addiction: सोशल मीडियावर रील किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहणे हा आजकाल लोकांमध्ये ट्रेंड बनत चालला आहे.
तुम्हाला सतत रील्स बघण्याची सवय आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
Reels AddictionDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर रील किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहणे हा आजकाल लोकांमध्ये ट्रेंड बनत चालला आहे. केवळ घरीच नाही तर मार्केट किंवा ऑफिसमध्येही लोक रील पाहताना दिसतात. फावला वेळ मिळाला की लोकांना कोणाशीही बोलणे किंवा वाचन करणे आवडत नाही, त्याऐवजी ते मोबाईलवर तासन्-तास रील्स पाहत बसतात. पण तुम्हाला माहिती आहे का रील्स पाहणे किती धोकादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, रील पाहणे किंवा स्क्रीन टाइम वाढवणे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकते. जर तुम्ही झोपेच्या वेळी स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असाल तर उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

दरम्यान, सतत रील्स पाहण्याने शरीर आणि मन एक्टिव राहते. यामुळे ना शरीराला विश्रांती मिळते ना मनाला. अशा परिस्थितीत, तणावाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्धभवू शकते. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने झोपेचं देखील खोबरं होतं आणि त्याचा हृदय आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो.

तुम्हाला सतत रील्स बघण्याची सवय आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
Heart Attack: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका; संशोधनातून खुलासा

संशोधनातून धक्कादायक खुलासा

अलीकडेच, बीएमसी जर्नलने चीनमधील 4,318 तरुणांचा अभ्यास केला. या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक रील पाहण्यात जास्त वेळ घालवतात त्यांना उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असते. रीलचे व्यसन असलेल्या तरुणांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. त्यामुळे हे तात्काळ टाळण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या मते, स्क्रीनवर जास्त वेळ घालवण्यापेक्षा लोकांशी बोलणे चांगले किंवा दुसरे काहीतरी करणे कधीही आरोग्यासाठी उत्तम.

रीलचे व्यसन

संशोधनात (Research), झोपण्यापूर्वी रील्स पाहण्याविरुद्धही इशारा देण्यात आला आहे. त्यात पुढे म्हटले की, पारंपारिक स्क्रीन टाइममध्ये टेलिव्हिजन पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे आणि संगणक वापरणे समाविष्ट आहे, उदाहरणार्थ, लोक टेलिव्हिजन पाहणे काही शारीरिक हालचालींशी जोडू शकतात. अभ्यासात असे आढळून आले की, झोपेच्या वेळी रील पाहणे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीसाठी हानिकारक ठरु शकते. खरे तर, बहुतेक लोक झोपेच्या वेळी शॉर्ट व्हिडिओ पाहतात. जे चुकीचे आहे. त्यामुळे आपण यापासून जितके दूर राहू तितके आपले शरीर निरोगी राहील.

तुम्हाला सतत रील्स बघण्याची सवय आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका

सवयी सुधारण्याची गरज

हेबेई मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, निरोगी जीवनशैली जगण्यासोबतच, उच्च रक्तदाब रोखण्यासाठी लोकांनी झोपेच्या वेळी व्हिडिओ पाहण्यात घालवलेल्या त्यांच्या स्क्रीन वेळेवर देखील नियंत्रण ठेवले पाहिजे. संशोधकांच्या मते, रील पाहण्याऐवजी पुस्तक वाचा, व्यायाम करा किंवा मित्रांना भेटा. झोपण्यापूर्वी फोन वापरणे थांबवा. यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच पण वेळही वाचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com