जेवताना पाणी पिणे टाळा अन् वाढत्या वजनाला घाला आळा

जापनीज पद्धत वापरून तुम्ही वजन कमी करू शकता.
japanese weight loss tips
japanese weight loss tipsDainik Gomantak

धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे आणि अयोग्य आहारामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. अनेक लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. पण तुम्ही जपानी पद्धत वापरून वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

Drinking water
Drinking water Dainik Gomantak
  • पाणी पिणे टाळावे

फक्त जपानीच नाही तर अनेक लोकांचा असा विश्वास आहे की जेवण करताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. तसेच वजन वाढते. त्यामुळे जेवणादरम्यान पाणी पिणे टाळावे.

Bathing
BathingDainik Gomantak
  • कोमट पाण्याने आंघोळ

जपानी लोक साधारणपणे वजन कमी करण्यासाठी ही ट्रीक वापरतात. असे मानले जाते की कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पचन चांगले होते. शरीराला अधिक कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. तसेच कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो.

Vegetable
VegetableDainik Gomantak
  • भाज्यांचे सेवन करावे

वजन कमी करण्यासाठी आणखी एक प्रभावी जपानी ट्रिक म्हणजे दिवसातून एक तरी भाजी खावी. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, प्रथिने, फायबर, पोटॅशियम यासारके घटक असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Healthy Food
Healthy FoodDainik Gomantak
  • पोषक पदार्थांचे सेवन

वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यामध्ये अंडी, दही, दूध, टोफू, पनीर आणि पदार्थांचा समावेश होतो. शरीरात पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासोबतच पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com