"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Premanand Maharaj Young Divorces: सध्याच्या काळात वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर त्यांनी आपले मत मांडले असून, त्यांचा व्हिडिओ विशेषतः चर्चेत आहे.
Premanand Maharaj viral Video
Premanand Maharaj viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Premanand Maharaj on Young Divorces: प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज, ज्यांचे लाखो अनुयायी आहेत त्यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. महाराज आपल्या भक्तांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आणि जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना दिसतात. सध्याच्या काळात वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर त्यांनी आपले मत मांडले असून, त्यांचा व्हिडिओ विशेषतः चर्चेत आहे.

लिव्ह-इन आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड संस्कृतीवर थेट टीका

प्रेमानंद महाराजांनी आपल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "जोपर्यंत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि लिव्ह-इन रिलेशनशिपची संस्कृती समाजात वाढत राहील, तोपर्यंत घटस्फोटाचे प्रमाण वाढतच राहील." ते पुढे म्हणाले की, "जर एखाद्या व्यक्तीला हॉटेलमधील विविध पदार्थांची चव चाखायला मिळाली, तर त्याला स्वतःच्या घरातील स्वयंपाकघरात शिजवलेले जेवण आवडेल का?" या उदाहरणातून त्यांनी आजकालच्या नातेसंबंधातील अस्थिरतेवर प्रकाश टाकला.

Premanand Maharaj viral Video
Govinda-Sunita Divorce: मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेयरमुळे गोविंदाचा घटस्फोट? इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

महाराज म्हणतात की, "जर तुम्ही चार वेळा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड केले, तर तुम्ही फक्त एकाच जोडीदारासोबत कसे राहू शकाल?" जे तरुण-तरुणी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून ब्रेकअप करतात, त्यांना नातेसंबंधांचे खरे महत्त्व कधीच कळणार नाही, असे प्रेमानंद महाराजांनी ठामपणे सांगितले. अशा लोकांना त्यांनी भ्रष्ट असे संबोधले, कारण त्यांच्या मते, असे लोक कोणत्याही एका जोडीदारासोबत दीर्घकाळ टिकू शकत नाहीत.

नात्यांचे पावित्र्य जपण्याचे आवाहन

प्रेमानंद महाराजांनी जोडप्यांना सल्ला दिला आहे की, जेव्हा दोन लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांनी आपल्या नात्याचे पावित्र्य जपले पाहिजे. त्यांनी मागील जुन्या नातेसंबंधांना विसरून एक नवी आणि शुद्ध सुरुवात करावी. नवीन नाते सुरू झाल्यावर, 'आजपासून आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात' असा विचार करावा. जोपर्यंत अशा 'घाणेरड्या चर्चा थांबणार नाहीत, तोपर्यंत घटस्फोटाचा प्रकार कायमचा थांबणार नाही असे ते म्हणाले.

आजची तरुण पिढी 'रिलेशनशिप डेटिंग ट्रेंड' मोठ्या प्रमाणात फॉलो करते, ज्यात सिच्युएशनशिप आणि बेंचिंग सारखे ट्रेंड समाविष्ट आहेत. अगदी 'DADT' (Don't Ask, Don't Tell) या संकल्पनेलाही महत्त्व दिले जाते. अशा नात्यांमध्ये फार कमी लोक गंभीर असतात, ज्यामुळे नात्यांमध्ये स्थिरता राहत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com