Pre Marriage Tips: लग्न ठरलय? मग मुलींनी उरकून घ्यावी 'ही' 4 कामे

प्रत्येक मुलीने ही ४ कामे लग्नाआधी उरकुन घ्यायला हवीत.
Pre Marriage Tips
Pre Marriage TipsDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न हा एक खास क्षण असतो. असं म्हणतात की लग्नानंतर मलींच्या आयुष्यात मोठा बदल होतो. लग्नानंतर मुली नवीन कुटुंबातील सदस्य होतात. मुलींसाठी कुटुंबात सहभागी होऊन नवीन नाते दृढ करणे हे मोठे आव्हान असते.अशावेळी मुलींनी लग्नाआधी काही काम करणे गरजेचे असते. ज्यामुळे त्यांना लग्नानंतर कोणतेही अडचण येत नाही.

  • सासरच्या लोकांना समजुण घेणे

लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला तिच्या सासरच्या लोकांबद्दल काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जसे कुटुंबात कोण आहे? घरातील लहान मुलांची नावे काय आहेत? यासारख्या इतर काही गोष्टी माहिती असाव्यात. जेणेकरून लग्नानंतर तुमच्याकडून नकळत कोणतीही चूक होणार नाही आणि सासरच्या लोकांवर तुमचा चांगला प्रभाव पडू शकतो.

  • लग्नाची खरेदी

लग्न म्हणटले की खरेदी आलीच...! लग्नाच्या दोन महिन्यापुर्वीच खरेदीला सुरूवात होते. पण या सर्वांमध्ये सर्वांची नजर ही मुलीच्या साड्या आणि ड्रेसवर असते. यामुळे मुलींनी कपडे,वस्तु यांची खरेदी पहिले करून घ्यावी.

Pre Marriage Tips
Vastu Tips For Purse: पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे मानले जाते अशुभ,वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं
  • तुमची कामे पुर्ण करावी

जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील तर ती लग्नापूर्वी पूर्ण करावी. काही महत्वाची किंवा अपूर्ण कामे असतील तर ती पूर्ण करून घ्यावी. यामुळे लग्नानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता.

  • चेहऱ्याची काळजी

लग्नापूर्वी मुली स्वत:कडे खुप लक्ष द्यायला लागतात. लग्नामध्ये उपस्थित असलेले नातेवाईक आणि पाहुणे सर्वांची नजर ही मुलीवरच असते. यामुळे त्या दिवशी सुंदर दिसणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण आपल्या सासरच्या लोकांवर प्रभाव पाडू शकतो. त्वचेची काळजी घेण्याच्या काही घरगुती पद्धतींचा वापर करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com