Pineapple Juice in Summer: उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात रोज प्यावा अननसाचा ज्यूस

अननसाचा ज्युस केवळ चवदार नसून ते आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
Pineapple Juice in Summer
Pineapple Juice in SummerDainik Gomantak

अननस हे असे फळ आहे जे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. लोकांना ते खायलाही आवडतं. जरी लोक गंमत म्हणून याचे सेवन करतात, परंतु तुम्हाला माहित आहे का ते किती आरोग्यदायी फायदे देऊ शकतात. (Benefits of Pineapple Juice in Summer)

अननसला सुपरफूड म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण त्यामध्ये ती सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळून येतात, जी उत्तम आरोग्य राखण्यासाठी जबाबदार असतात.

या फळाचा प्रभाव थंड असतो.  उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने किंवा त्याचा ज्युस पिल्याने कोणता फायदा होतो हे जाणून घेउया.

  • पचनसंस्था सुरळीत करते

उन्हाळ्यात (Summer) अनेकदा पचनसंस्था नीट काम करत नाही. गॅस अॅसिडिटी, डायरिया, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात (Morning Breakfast) अननसाचा ज्यूस प्या, पोट चांगले स्वच्छ होईल आणि ताजेपणा राहील. 

  • हाडे मजबूत

हाडांच्या मजबुतीसाठी तुम्ही अननसाचा रस देखील पिऊ शकता. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅंगनीज असल्याने दात आणि हाडे मजबूत होतात.

  • हृदयविकार

अननसात अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते, जे तुम्हाला हृदयरोगापासून वाचवते, जे लोक हाय बीपीच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी त्यांच्या आहारात (Diet) अननसाचा समावेश जरूर करावा. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

  • डोळ्यांसाठी फायदेशीर

अननसाचा रस डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे डोळ्यांच्या (Eyes) समस्या दूर होतात. त्याचा रस लहान मुलाला सुरुवातीपासूनच द्यावा, म्हणजे लहान वयातच त्याची दृष्टी कमजोर होणार नाही.

  • त्वचेसाठी महत्त्वाचे

अननस खाणे किंवा त्याचा रस पिणे त्वचेशी संबंधित समस्यांमध्येही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे मुरुमांबरोबरच चट्टेही कमी होतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा सुधारण्यास मदत करते, त्वचेतील मृत त्वचा काढून टाकून त्वचा सुधारते.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते

अननसाचा रस अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते . तुम्हाला उर्जेने परिपूर्ण ठेवते. हंगामी आजारांचा धोका दूर करते.

  • वजन कमी होते

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी अननसाच्या रसाचाही आहारात समावेश करावा. यामध्ये कॅलरी किंवा फॅट नसते, यासोबतच तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com