Pierre Robin Syndrome: काय आहे पियरे रॉबिन सिंड्रोम? मुलाच्या जबड्याचा आकार बदलतो, गंभीर श्वसनाचा त्रास होतो; जाणून प्रतिबंधात्मक उपचार

Why Does PRS Syndrome Occur: जगभरात अनेक प्रकारचे आजार आहेत. या आजारांपैकी एक म्हणजे पियरे रॉबिन सिंड्रोम (पीआरएस), जो एक प्रकारचा जन्मजात दोष आहे.
Pierre Robin Syndrome
ChildDainik Gomantak
Published on
Updated on

Why Does PRS Syndrome Occur? Causes, Symptoms & Diagnosis

जगभरात अनेक प्रकारचे आजार आहेत. या आजारांपैकी एक म्हणजे पियरे रॉबिन सिंड्रोम (पीआरएस), जो एक प्रकारचा जन्मदोष आहे. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या मुलांचे जबडे विकसित होत नाही, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया करावी लागते. दरम्यान, जरी हा एक दुर्मिळ आजार असला तरी भारतात त्याचे रुग्ण गेल्या काही दिवसात आढळले आहेत. दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या कलावती सरन रुग्णालयात पीआरएसने ग्रस्त असणाऱ्या 70 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. कलावती रुग्णालय हे मुलांच्या उपचारांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे रुग्णालय मानले जाते.

पियरे रॉबिन सिंड्रोम

पियरे रॉबिन सिंड्रोम (पीआरएस) हा गर्भाशयात बाळाच्या विकासादरम्यान होतो. या सिंड्रोममुळे बाळाच्या जबड्यावर आणि तोंडावर परिणाम होतो, ज्यामुळे त्याला श्वास घेणे, स्तनपान करणे किंवा बाटलीतून दूध पिणे देखील कठीण होते. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि असोसिएटेड हॉस्पिटल्समधील ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे संचालक डॉ. प्रवेश मेहरा यांनी या आजाराबद्दल सांगितले आहे.

Pierre Robin Syndrome
Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

70 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली

डॉ. मेहरा यांनी सांगितले की, गेल्या 5 वर्षांत रुग्णालयात पियरे रॉबिन सिंड्रोमने ग्रस्त 70 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचे वय 7 दिवस ते 15 वर्षे होते. पियरे रॉबिन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या मुलाला प्रामुख्याने तीन प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. ऑक्सिजन (Oxygen) सपोर्टचीही गरज भासू शकते.

काय आहे पीआरएस सिंड्रोम?

गर्भाशयात गर्भाच्या विकासादरम्यान होणारे काही अनुवांशिक बदल गर्भाच्या चेहऱ्याच्या संरचनेच्या निर्मितीचा क्रम बदलू शकतात. जेव्हा मुलाचा जबडा जसा आपेक्षित आहे तसा विकसित होत नाही, तेव्हा त्याची जीभ मागे सरकते. या आजारामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होतो. मुलाला खायला घालणे देखील कठीण होते. रोगाचे निदान करण्यासाठी संगणकीय टोमोग्राफी (सीटी) स्कॅन केली जाते.

Pierre Robin Syndrome
Cancer In Kids: लहान मुलांना कॅन्सर झाल्यास दिसतात 'ही' लक्षणे; जाणून घ्या डॉक्टरांनी काय सांगितले?

उपचार कसे केले जातात?

या आजाराचा उपचार मँडिब्युलर डिस्ट्रक्शन ऑस्टियोजेनेसिसने केला जातो. या शस्त्रक्रियेमुळे मुलाच्या जबड्याचा आकार बदलतो, ज्यामुळे तो बरा होण्यास मदत होते. याशिवाय, ट्रेकेओस्टोमी देखील वापरली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com