Parenting Tips: लहान मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'या' 9 गोष्टी शिकवा

काही छोट्या गोष्टी देखील लहान मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
Parenting Tips
Parenting TipsDainik Gomantak

Parenting Tips: तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावणे हे तुमची जबाबदारी असते. लहान मुलांना योग्य शिक्षणासोबतच चांगले संस्कार देणे देखील गरजेचे असते. काही छोट्या गोष्टी देखील लहान मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. लहान मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

  • आदर करायला शिकवावे

लहान मुलांना नेहमी मोठ्यांचा आदर करायला शिकवावे. मोठ्यांचा आदर करणे ही एक चांगली गोष्ट आहे. लहानपणीच अशी सवय लावल्यास मोठे झाल्यावर त्यांना मोठ्यांशी कसे बोलावे कसे वागावे सोपे होइल.

  • नम्रतेने बोलणे शिकवावे

लहान मुलांना नेहमी इतर लोकांशी बोलतांना नम्रतेने बोलायला शिकवावे. ही एक चांगली गोष्ट आहे. लहानपणीच अशी सवय लावल्यास मोठे झाल्यावर त्यांना कोणतेही समस्या येत नाही. अन्यथा मुल भांडखोर होऊ शकतात.

  • स्वच्छता करायला शिकवावी

लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व शिकवावे. त्यांना छोटी छोटी कामे करायाला सांगावी. जसे की कचरा उचलणे आणि डस्टबिनमध्ये टाकणे, फर्निचरची धूळ स्वच्छ करणे अशी कामे तुम्ही त्यांना करायला लावू शकता. त्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याची सवयही विकसित होईल.

Parenting Tips
Vastu Tips For Temple: 'या' दिवशी देवघर करावे स्वच्छ; होईल आर्थिक लाभ
  • नेहमी प्रोत्साहन द्यावे

लहान मुलांना ज्या चांगल्या गोष्टी करायला आवडतात त्यामध्ये प्रोत्साहन द्यावे. यामुळे ते यशावर मार्गावर प्रवास करू शकतात. त्यांना कुठे अडचण येत असल्यास मदत करावी.

  • मिळून-मिसळून राहायला शिकवावे

लहान मुलांना समाजात मिळून -मिसळून राहायला शिकवावे. यामुळे त्यांना एकत्र येवून काम कसे करावे हे समजण्यास मदत होईल. तसेच एकतेची भावना वाढीस लागेल.

  • स्वयंपाक करायला शिकवावे

लहानपणापासूनच मुलांना स्वयंपाक घरातील काम करायला शिकवावे. यामुळे त्यांना पुढे कठिण जाणार नाही. अनेक मुलांना शिक्षणासाठी घराबाहेर गेल्यावर अवघड जाते. तसेच एकटे राहाण्याची वेळ आल्यावर त्यांना थोडे तरी स्वयंपाकघरातील काम येत असेल तर त्यांना अवघड जाणार नाही.

  • स्वत:च्या कपड्यांची काळजी

लहान मुलांना स्वतःच्या कपड्यांची काळजी घ्यायला शिकवावे. जसे की कपडे नीट घड्या करून ठेवणे, प्रेस करणे, कपाटामध्ये नीट ठेवणे, बॅग भरणे यासारख्या गोष्टी शिकवाव्या.

  • पैशासंबंधित व्यवहार

लहान मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठी पैशाचे व्यवहार शिकवणे गरजेचे आहे. तसेच मुलांना सेविंग करायला शिकवावे. लहानपणीच आर्थिक परिस्थितीबद्दल समजावून सांगितल्यास त्यांना पुढे जावून कोणतेही आर्थिक अडचण येणार नाही.

  • वेळेचे आणि कामाचे नियोजन

लहान मुलांना वेळेचे आणि कामाचे नियोजन शिकवणे गरजेचे आहे. यामुळे त्यांची कोणतेही काम करतांना वेळेवर धावपळ होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com