Panic Attack Treatment: आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि ऑफिसमधील कामाचा ताण यामुळे अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक वेळा लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, परंतु चिंता आणि तणावाकडे दुर्लक्ष करू नका.
कारण पुढे ते इतर अनेक मानसिक समस्यांचे कारण बनु शकते. यापैकी एक म्हणजे पॅनीक अटॅक. एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंताग्रस्ततेमुळे पॅनीक अटॅक येऊ शकतो.
हा झटका हृदयविकाराच्या झटक्यासारखा वाटतो आणि अशावेळी रुग्ण स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतो. पॅनिक अटॅक हे धोकादायक नसले तरी त्याच्यामुळे तुमच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा वेळी काय करावे हे जाणू घेऊया.
तुम्हाला आधी कधीहू पॅनीक अटॅक आला असेल तर पुन्हा असे होऊ नये यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. कारण व्यायम केल्याने शारिरिरक हालचाल होते. तसेच मुड सुधारतो आणि मन शांत होते. यामुळे तणाव कमी होऊन पॅनिक अटॅकचा धोका कमी होतो.
तुम्हाला पॅनीक अटॅक येत असल्यास, दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू मोजावा. जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर सोप्या उपायांचा वापर करावा. यामुळे तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता आणि श्वास सोडाताना हृदयाचे ठोके मोजावे.
थंड पाण्याने आलेला पॅनीक अटॅक कमी करता येतो. जेव्हा अॅटॅक येतो तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा किंवा बर्फाच्या पाण्याचा वापर करावा. चेहऱ्यासह मान पुसून घ्यावी आणि डोक्यावर थंड टॉवेल ठेवावा. यामुळे मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
नियमितपणे योगा करावा.
मिडिटेशन केल्याने तणाव कमी होतो.
पोषक आणि योग्य वेळी आहार घ्यावा.
कॉफीचे अतिशेवन टाळावे.
मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.