टॉकींग विन्डोज.. इनसाईड.. आउटसाईड

चोगम रस्ता, पर्वरीच्या जिओआनी फर्नांडीस यांच्या ‘क्वाडिओ आर्ट गॅलरी’त आलेक्सीजच्या १२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे.
Painting Exhibition
Painting ExhibitionDainik Gomantak
Published on
Updated on

Painting Exhibition: खिडकी (Window) केवळ घराबाहेरची असणारी दृश्ये पाहण्याचे माध्यम असते काय? व्यंग्यचित्रकार (Cartoonist) आलेक्सीज म्हणतात, खिडकी उघडताच त्यांना बाहेर दिसणाऱ्या दृश्यातून आनंद जाणवायला पाहिजे, खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर मनात शांततेची अनुभूती जाणवली पाहिजे. आलेक्सीज शिवोली या निसर्गसुंदर गावचे. आनंदाने तृप्त करणाऱ्या अनेक पारंपरिक (Traditional) गोष्टी त्यांनी अनुभवल्या आहेत. त्या समृद्ध परंपरेवर त्यांचे निस्सिम प्रेम आहे.त्यात गोव्याची (Goa) वारसास्थळे आहेत, संगीत आहे, प्रतिभाशाली गोमंतकीय आहेत.

Painting Exhibition
शिरपेचात अजून एक तुरा..!

आलेक्सीज म्हणतात, या साऱ्या गोष्टी खिडकी उघडताच त्यांच्यासमोर त्यांच्या वैशिष्ट्यानिशी आकार घेतात. त्या साऱ्या गोष्टीना आलेक्सीज आपल्या कल्पनांत खेळवतात आणि त्यांना आनंदस्वरूप बनवून आपल्या चित्रांमधून रंगवतात. त्यांच्या चित्रातल्या स्थळांना, व्यक्तीना मग वेगळेच वैशिष्ट्य लाभते आणि त्यांची चित्रे पाहताना आपल्याही मनात खुसखुशीत हास्य फुटते.

एरवीही गोव्याच्या पोर्तुगीज धाटणीच्या घरांच्या खिडक्या खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात. ज्यावेळी गोव्यात अजून ‘काच’ आली नव्हती तेव्हा ‘मदर ऑफ पर्ल’ शिंपल्याचा आतला भाग, जो अन्यथा टाकाऊ होता, त्याला विशिष्ट आकार देऊन, त्यांना लाकडी कपारीत बसवून त्यांची तावदाने बनवली गेली. त्यातून पाझरणारा सुंदर मुलायम प्रकाश घराच्या आतल्या भागाला सौंदर्य प्रदान करायचा. आलेक्सीजला तो प्रकाश आठवतो. त्या खोलीत चाललेली संगीताची छोटेखानी कौटुंबिक मैफल त्याला आठवते. पण आलेक्सीजचे कल्पनाविश्र्व तिथेच थांबत नाही.

Painting Exhibition
गोवा फॉरवर्डकडून जयेश साळगावकरांना कारणे दाखवा नोटीस

या सुंदर वातावरणात गोव्याला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या व्यक्तीना तो निमंत्रित करतो आणि आपल्या चित्रांमधून त्यांना रेखाटतो. त्याच्या त्या चित्रात मग संगीतकार ॲन्थनी गोन्साल्विस दिसतात जे अमिताभ बच्चनबरोबर संवाद साधत असतात.आबे फारीया दीपिका पडुकोणवर भूल घालत असतो. तिथे जॅझी ज्यो असतो, लॉर्ना असते, डॉ. फ्रान्सिस्को कुलासो असतात, कॉलीन डिक्रुझ असतो. हे सारे आलेक्सीजच्या चित्रांमधल्या खिडक्यांचा भाग बनतात. खिडक्यांच्या आत आणि बाहेर आलेक्सीज असे आनंदाचे विश्र्व फार मिश्किलपूर्वक तयार करतो.

चोगम रस्ता, पर्वरीच्या जिओआनी फर्नांडीस यांच्या ‘क्वाडिओ आर्ट गॅलरी’त आलेक्सीजच्या १२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन ६ डिसेंबरपर्यंत चालेल. प्रदर्शनाचे नावदेखील फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘जनेलास दी गोवा : टॉकींग विन्डोज.. इनसाईड.. आउटसाईड’. ही चित्रे म्हणजे आलेक्सीजच्या गोव्याच्या प्रेमातून तयार झालेली खिडकीतली भावविश्र्वेच आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com