शिरपेचात अजून एक तुरा..!

हा माहितीपट म्हणजे उभयलिंगी समुदायासाठी उभारलेल्या चिकित्सालयाच्या मार्गात येणाऱ्या समस्या मांडण्याचे आणि त्यावर चर्चा होण्याचे एक उत्कृष्ट माध्यम ठरले...
52 IFFI 2021
52 IFFI 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2021 : पर्वरीच्या अक्षय पर्वतकरला हल्लीच इफ्फीत‘ 75 क्रिएटिव्ह माईंडस’चा भाग व्हायची संधी लाभली होती. देशभरातून निवडण्यात आलेल्या पंच्याहत्तर युवा प्रज्ञावंत सिनेकर्मीत त्याचाही समावेश होता. त्यानंतर लागलीच त्याच्याबाबतीत घडलेली आनंदाची गोष्ट म्हणजे, त्याने लिहिलेल्या एका माहितीपटाचे प्रदर्शन 30 नोव्हेंबर रोजी दिल्लीतल्या अमेरिकन सेंटरमध्ये झाले. अमेरिकेच्या दूतावासामार्फत हे प्रदर्शन घडवण्यात आले होते.

अक्षयने लिहिलेल्या या दहा मिनिटांच्या माहितीपटाचा विषय होता, ‘हैदराबाद येथील उभयलिंगी समुदायासाठी असलेले चिकित्सालय’. हा माहितीपट उभयलिंगी समुदायाचा संघर्ष चित्रित करतो.

52 IFFI 2021
IFFI 2021 मध्ये रणधीर कपूरची एक झलक

तीव्र भेदभावाची परिस्थिती अवतीभवती असूनसुद्धा कशाप्रकारे त्यांनी, त्यांच्यासाठीच, ही सुरक्षित जागा तयार केली आहे त्याबद्दल सांगतो.

अक्षय म्हणतो, ह्या डॉक्युमेंट्रीवर काम करण्याचा त्याचा अनुभव खूप छान होता. चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीकांतसोबत ऑगस्ट महिन्यात हैद्राबादला जाऊन त्याने क्लिनिकला भेट दिली आणि सर्वप्रथम क्लिनिक चालवण्यात गुंतलेल्या तिथल्या लोकांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत, त्यांच्या घरी, त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यानी ४ दिवस घालवले आणि त्यांना जाणून घेतले आणि त्यानंतर अक्षयने या माहितीपटासाठी संहिता लिहायला सुरुवात केली. त्या दरम्यान श्रीकांतबरोबर त्याचा संवाद सतत सुरू होता. अक्षय म्हणतो, या प्रक्रियेचा त्याला त्याच्या लिहिण्यात खूप फायदा झाला. या विषयासंबंधीची सैद्धांतिक बाजू आणि त्या लोकांचे प्रतिनिधित्व संहितेमध्ये काटेकोरपणे उतरणे आवश्यक होते.

52 IFFI 2021
52 IFFI चा रंगारंग समारोप

माहितीपटाच्या प्रदर्शनावेळी चिकित्सालयातले सारे जण हजर होते. हा माहितीपट म्हणजे उभयलिंगी समुदायासाठी उभारलेल्या चिकित्सालयाच्या मार्गात येणाऱ्या समस्या मांडण्याचे आणि त्यावर चर्चा होण्याचे एक उत्कृष्ट माध्यम ठरले. या माहितीपटाच्या प्रदर्शनाला नाटोचे प्रतिनिधी, अमेरिकन दूतावासाचे उच्चपदस्थ आणि भारतीय सरकारचे अधिकारी हजर होते. माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ चिकित्सालयाचे डॉक्टर आणि व्यवस्थापक यामध्ये औपचारिक चर्चाही घडवून आणली गेली.

अक्षय म्हणतो एका प्रखर प्रयत्नातून आकार घेतलेल्या, एका संस्मरणीय कामाशी संबंधित असलेल्या माहितीपटाचा महत्त्वाचा भाग बनण्याचे हे काम त्याच्यासाठी बहुमानाचे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com