Budhwar Upay: आज विघ्नहर्त्याची कृपादृष्टी व्हावी म्हणून करावे 'हे' खास उपाय

आजचा दिवस हा बुद्धीची देवता म्हणजेच गणपती बाप्पाला समर्पित वार आहे.
Ganpati Bappa morya
Ganpati Bappa moryaDainik Gomantak
Published on
Updated on

Budhwar Upay: आठवड्याचा कोणता ना कोणता दिवस देवतेला समर्पित आहे. मात्र असं असलं तरीही त्या दिवशी त्या देवतेचा प्रभाव सर्वात जास्त असतो असे मानले जाते. तुम्ही जर देवभक्त असाल तर तुम्हाला त्या त्या दिवशी कोणत्या देवतेचा तो वार आहे, हे नक्कीच माहिती असेल.

आजचा दिवस हा बुद्धीची देवता म्हणजेच गणपती बाप्पाला समर्पित वार आहे. याशिवाय हा वार मुळात बुधाचा आहे. बुध हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, वाणी, त्वचा, सौंदर्य आणि सुगंध यांचाही कारक आहे.

गणपती बाप्पाला (Ganapti Gappa) विघ्नहर्ता या नावानेही संबोधले जाते. मग तुमच्यावर काही विघ्नं आली असतील आणि तुम्हाला त्यापासून मुक्ती हवी असेल तर गणपती बाप्पांना या उपायांनी प्रसन्न केल्यास अनेक समस्या दुर होतील.

  • बुधवारी कोणते उपाय करावेत

बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो. गणेश हा बुद्धी देणारा आहे असे म्हटले जाते. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. जर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण केल्या तर तुमच्या जीवनात कधीही अडचणी येणार नाहीत आणि विघ्नहर्त्यांचा आशीर्वाद कायम राहील.

Ganpati Bappa morya
Women's Day Gift Idea: आपल्या लेडी लव्हला 'हे' स्पेशल गिफ्ट देऊन करा खुश
  • गणपती बाप्पाला उकडीचे मोदकही अर्पण करावे. कारण मोदक अतिशय प्रिय आहेत

  • जर एखाद्या व्यक्तीला बुध दोष असेल तर त्याने माता दुर्गेची पूजा करावी. 'ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे' या मंत्राचा दररोज जप करावा.

  • धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू वापरणे शुभ असते. जर तुमचा बुध अशक्त असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा. तसेच बुधवारी गरजूंना हिरवी मूग डाळ दान करा.

  • बुध दोष दूर करण्यासाठी सोन्याचे दागिने घालणे फायदेशीर मानले जाते.

  • बुध दोष दूर करण्यासाठी हाताच्या सर्वात लहान बोटात म्हणजे करंगळीमध्ये पन्ना धारण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र यासाठी पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गाईला गवत खाऊ घालावे. असे म्हटले जाते की, वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजनाएवढे गवत खरेदी करून गोठ्यात दान करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com