Women's Day Gift Ideas: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. यंदा आपल्या लेडी लव्हला स्पेशल फील करुन देण्यासाठी तुम्ही काही तरी खास केले पाहिजे. यासाठी सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे तुमच्या खास व्यक्तीला काहीतरी खास भेट द्यावी.
ज्वेलरी
महिलांना दागिन्यांची खुप आवड असते. अंगठीपासून ते इयररिंग्स, झुमक्यांपर्यंत तिला नेहमीच लेटेस्ट कलेक्शन त्यांना सोबत ठेवायचे असते. तुम्ही त्यांना काही ट्रेंडी ज्वेली गिफ्ट देऊ शकता.
पुस्तके
काही महिलांना (Women) त्यांच्या मोकळ्या वेळेत पुस्तके वाचायला आवडतात. जर तुमच्या प्रिय व्यक्तीलाही वाचनाची आवड असेल, तर तुम्ही त्यांना नवीन पुस्तके भेट देऊ शकता किंवा आजकाल फोनवर येणारी पुस्तके वाचण्यासाठी अॅपचे सदस्यत्व घेऊ शकता.
स्मार्ट वॉच
जर तुमची लेडी लव्ह फिटनेस फ्रीक असेल आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असेल तर स्मार्ट वॉच बेस्ट गिफ्ट असेल. या घड्याळातील वेळ पाहण्यासोबतच तिला तिच्या फिटनेसचीही काळजी घेता येईल.
हँडबॅग
ही एक अशी भेट आहे जी महिलांसाठी नेहमी उपयोगी पडते. ऑफिसला जाणे असो किंवा खरेदीसाठी, महिला नेहमी आपल्या हँडबॅग सोबत ठेवतात लागते. यातही अनेक प्रकार आहेत. प्रत्येक मुलीकडे हँडबॅग असते. पण तरीही नवीन हँडबॅग पाहून तिला आनंद होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.