पावसाळा (Rain) आला की त्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. डेंग्यू (dengue), मलेरिया आणि इतर आरोग्यविषयक (Health) समस्यांचा धोकाही या हंगामात वाढतो. दरवर्षी डेंग्यूमुळे अनेकांचा जीव जातो. मोठ्या संख्येने वातावरणार डासांची निर्मीती होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती देखील डेंग्यूच्या संसर्गास कारणीभूत ठरते. डेंग्यूच्या सामान्य लक्षणांमध्ये (Symptoms) शरीर दुखणे, तिव्र ताप, थकवा, उलट्या होणे, हिरड्या किंवा नाकातून थोडा रक्तस्त्राव होणे आणि त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षण आढळतात. अशा परिस्थितीत, स्वतःला डेंग्यूपासून वाचवण्यासाठी बाह्य संरक्षणासह अंतर्गत सुरक्षा देखील आवश्यक आहे. आणि तुमच्या आहारात त्या गोष्टींचा समावेश करून तुम्ही ते आंतरिक संरक्षण मिळवू शकता.
डेंग्यू टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा
1. भरपूर पाणी प्या
भरपूर पणी पिणे हे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याबरोबरच संसर्ग टाळण्याचा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे, विषारी पदार्थ तुमच्या शरीरातून लघवीद्वारे बाहेर पडतात.
2. रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पेय
आपण सहजपणे घरी प्रतिकारशक्ती वाढवणारे पेय तयार करू शकता. 1 ग्लास दुधात थोडे पाणी, एक चिमूटभर हळद, 2-3 केशर आणि थोडे जायफळ मिसळा. चव वाढवण्यासाठी तुम्ही गूळ वापरू शकता. हे इम्यूनिटी बूस्टर ड्रिंक गरम किंवा थंड दोन्ही पद्दतीने घेतले जाऊ शकते.
3. राईस सूप
याला तांदळाची कांजी किंवा खिर असेही म्हणतात. तांदळाच्या सूपमध्ये हिंग, काळे मीठ आणि तूप घालून तुम्ही ते घेऊ शकता. यामुळे भूक वाढते आणि डिहायड्रेशन सुधारते. याशिवाय, तांदळाचे सूप इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास देखील मदत करते.
4. गुलकंद
फक्त 1 चमचा गुलकंदांने आपली पाचन शक्ती सुधारते. मळमळ आणि अॅसिडीटीसारख्या पोटाच्या समस्या गुलकंदाने कमी होतात. आपण जेवणापूर्वी गुलकंद खाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने हे अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
डेंग्यू टाळण्यासाठी बाह्य उपाय
1. ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करा
2. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा मच्छरदाणी काळजीपूर्वक वापरा.
3. घरात किंवा बाहेर कुठेही पाणी साचू देऊ नका.
4. घरात 30 मिनिटं कापूर जाळत ठेवा आणि कापूर जाळताना सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. यामुळे घरात असलेल्या डेंग्यूच्या डासांचा नाश होईल.
5. घराच्या खिडक्या आणि दरवाजांवर तुळशीचे रोप लावा. यामुळे डास घरात शिरू शकणार नाहीत.
6. कुलर, भांडी, छत, जुने टायर, तुटलेल्या भांड्यात पाणी भरून घरात ठेवू नका.
7. घराच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या.
8. पूर्ण बाहीचे कपडे घाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.