New Year Resolutions 2024: नव वर्ष 2024 च्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहे. वर्षाच्या सुरूवातीला आपण अनेक संकल्प करतो. ही संकल्प काम, आरोग्य यासारख्या गोष्टींशी संबंधित असते. नवीन वर्षात कोणते संकल्प करावे हे जाणून घेऊया. जेणेकरून तुमचे संपुर्ण आयुष्य बदलून जाईल.
1. डायरी लिहिणे
नवीन वर्षात हा एक चांगला संकल्प असू शकतो. दिवसभरात तुमच्या सोबत घडलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी डायरी मध्ये लिहू शकता.
2. नविन ठिकाणांना भेट देणे
तुम्हाला जर फिरण्याची आवड असेल तर तुम्ही नव वर्षात नवीन ठिकाणांना बेट देण्याचा संकल्प करू शकता. यामुळे तुम्ही अविस्मरणीय आठवणी देखील तयार करू शकता.
3. ओळखी वाढवणे
तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्रातील लोकांशी ओळखी वाढवू शकता. जसे की तुम्हाला क्रिडा क्षेत्रात आवड असेल तर त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींबद्दल माहिती करून घ्यावी.
4. पौष्टिक आहार घेणे
आरोग्यम् धन संपदा! नव वर्षात निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. यामुळे वर्षभर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.
5. पुस्तक वाचणे
वाचाल तर वाचाल! नव वर्षात तुम्ही पुस्तक वाचण्याचा संकल्प करू शकता. पुस्तक वाचल्याने ज्ञानात भर पडते.
6. व्यायाम करणे
निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर असते. नवीन वर्ष निरोगी राहण्यासाठी नियमितपणे सकाळी व्यायाम करावा. हा संकल्प तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
7. स्वत:ला वेळ देणे
नवीन वर्षात स्वत:ला वेळ देण्याचा संकल्प करावा. यामुळे स्वत:ला समजून घेण्यास मदत मिळेल.
8. नविन गोष्टी शिकणे
नव वर्षात नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. जसे की कोणताही खेळ, भाषा, तंत्रज्ञान शिकू शकता.
9. पैशांची बचत करणे
तुम्ही नव वर्षात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करू शकता. यामुळे पैशांची बचत तर होईलच आणि तुम्हाला भविष्यात बिकट परिस्थित ते पैसे उपयोगात येईल.
10. वाईट सवयी सोडा
जर तुम्हाला कोणतेही वाईट सवय असेल तर ती सोडण्याचा संकल्प करावा. यामुळे नव वर्ष तुम्हाला आनंदात जगता येईल.
11. वजन कमी करणे
नव वर्षात तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प करू शकता. यासाठी तुम्ही जीम किंवा योगा करू शकता.
12. ध्येय निश्चित करा
आयुष्यात ध्येय नसेल तर जगण्याला काही अर्थ नाही. यामुळे नव वर्षात एक ध्येय निश्चित करावे. तसेच ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.
13. सोशल मिडियाचा वापर कमी
सध्या सगळेजण सोशल मिडियावर खुप वेळ घालवतात. पण नव वर्षात तुम्ही सोशल मिडियावर कमी वेळ घालवण्याचा संकल्प करू शकता.
14. पर्सनर डेव्हलपमेंटवर भर द्यावे
नव वर्षात पर्सनर डेव्हलपमेंटवर भर द्यावा. यामुळे तुम्हाला यशाचे शिखर गाठण्यास मदत मिळेल.
15. छंद जोपासणे
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. जर तुम्हालाही कोणता छंद असेल तर तुम्ही नव वर्षात तो जोपासण्याचा संकल्प करू शकता.
16. कुटूंबाला वेळ द्या
कामामुळे तुम्हा कुटूंबाला वेळ देऊ शकत नाही. पण नव वर्षात कुटूंबाला वेळ देण्याचा संकल्प करू शकता.
17. वर्तमानपत्र वाचणे
रोज वर्तमानपत्र वाचल्याने ज्ञानात भर पडते. तसेच तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती राहते. तुमची भाषा सुधारण्यास मदत मिळते. यामुळे नव वर्षात वर्तमानपत्र वाचण्याचा संकल्प करावा.
18. निस्वार्थ भावनेने लोकांना मदत करणे
नव वर्षात निस्वार्थ भावनेने लोकांना मदत करण्याचा संकल्प करू शकता.
19. वेळ पाळणे
कोणाला भेटण्याची वेळ दिली असेल तर त्या वेळेत जावे. दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करावी.
20. स्वच्छता ठेवणे
नव वर्षात स्वच्छता ठेवण्याचा संकल्प करू शकता. यामुळे अनेक संसर्ग दूर राहतील.
21. तणावमुक्त राहाल
नव वर्षात तणावमुक्त राहण्याचा संकल्प करा. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील निरोगी राहिल.
22. स्वावलंबी बना
नव वर्षात स्वावलंबी बनण्याचा संकल्प करावा. स्वत:ची कामे स्वत: करावी.
23. घर किंवा कार घेणे
अनेक लोक घर किंवा कार खरेदी करण्याता देखील संकल्प करतात.
24. आर्थिक साक्षर होणे
नव वर्षात स्वत:ला आर्थिक साक्षर करण्याचा संकल्प करू शकता. यामध्ये बँकेसंबंधित व्यवहार, गुंतवणूक यासारख्या गोष्टींचा समावेष करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.