Last Pradosh Vrat 2022: वर्षातलं शेवटचं प्रदोष व्रत आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Last Pradosh Vrat Of The Year Today: आज 2022 या कॅलेंडर वर्षातलं शेवटचं प्रदोष व्रत आहे.
 lord shiva
lord shivaDainik Gomantak
Published on
Updated on

प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. एक कृष्ण पक्षात तर दुसरे शुक्ल पक्षात. वर्षभरात 24 प्रदोष व्रत केली जातात. मार्गशीर्ष महिन्यातले कृष्ण पक्षातले प्रदोष व्रत आज आहे. आज बुधवार आहे. त्यामुळे या प्रदोषाला बुध प्रदोष व्रत असेही म्हटले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास आणि उपासना केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

  • बुध प्रदोष व्रत 21 डिसेंबर 2022 शुभ काळ

बुध प्रदोषाची सुरुवात होईल आज म्हणजेच 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 12 वाजून 45 मिनिटापासून तर हे व्रत 21 डिसेंबरच्या रात्री 10 वाजून 16 मिनिटांनी संपणार आहे.

  • प्रदोष काळ

प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात पूजेला विशेष महत्त्व आहे. प्रदोष काळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी सुरू होतो. प्रदोष काळात भगवान शंकराची आराधना केल्याने शुभ फळ मिळते असे म्हटले जाते.

  • प्रदोष व्रताचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील सात दिवसांच्या प्रदोष व्रताचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रत पाळल्याने संतानसुख प्राप्त होते. हे व्रत पाळल्याने बालपक्षालाही फायदा होतो. या व्रताचे पालन केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

 lord shiva
Piles Home Treatment: तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाही होऊ शकता मूळव्याधाचे शिकार
  • प्रदोष व्रत पूजा - साहित्य

पुजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे गुलाल, चंदन, अक्षत, फुले, धतुरा, बिल्वपत्र, जानवं, कलव, दीपक, कापूर, अगरबत्ती आणि फळे इ.साहित्य लागतात.

  • प्रदोष व्रत पूजा - पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ करावी.

आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला.

घरातील मंदिरात दिवा लावावा.

भगवान भोलेनाथांचा गंगाजलाने अभिषेक करा.

भगवान भोलेनाथांना फुले अर्पण करावी.

या दिवशी भोलेनाथसोबत देवी पार्वती आणि गणेशाची पूजा करावी. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते.

भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा.

भगवान शिवाची आराधना करा.

या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com