Calendar 2023 Vastu Tips: घरात नवे कॅलेंडर लावण्यापुर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर योग्य दिशेने लावल्यास तुमचे भाग्य उजळू शकते.
Calendrer 2023 Vastu Tips:
Calendrer 2023 Vastu Tips:Dainik Gomantak
Published on
Updated on

नविन वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. सर्वजण नव्या वर्षाचे कॅलेंडर आणणार असतील. पण हे कॅलेडर घरी लावण्यासाठी वास्तुशास्त्रात कोणती दिशा योग्य आहे सांगितले आहे. जर वास्तुशास्त्रानुसार कॅलेडर योग्य दिशेने लावल्यास तुमचे भाग्य चमकेल. चला तर मग जाणून घेउया वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) घरामध्ये कॅलेंडर कुठे आणि कसे ठेवावे.

वास्तुशास्त्रानुसार अनेकदा घाईघाईने किंवा काही कारणास्तव जुन्या कॅलेंडरच्या वरती नवीन कॅलेंडर लावले जाते. त्यामुळे अनेक दिवस घराच्या भिंतींवर जुनी कॅलेंडर तशीच राहतात. वास्तूमध्ये जुने कॅलेंडर लटकवणे चांगले मानले जात नाही. यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच भविष्याच्या रूपरेषेवरही परिणाम होत असून नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्याची उर्जा कमी आहे. म्हणूनच भिंतीवरून जुने कॅलेंडर काढून नवीन वर्षाचे नवे कॅलेंडर घरात लावावे.

वास्तूनुसार (Vastu Tips) नवीन वर्षात घराच्या उत्तर, पश्चिम किंवा पुर्व भिंतीवर लावणे शुभ मानले जाते. घर, ऑफिस किंवा दुकान इत्यादी ठिकाणी या दिशांना नवीन वर्षांचे कॅलेंडर लावल्यास जीवनात प्रगती होते आणि वर्षभर समस्या दुर राहतात. कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये, असे केल्यास घरातील सदस्याचे आरोग्य निरोगी राहत नाही.

Calendrer 2023 Vastu Tips:
Last Pradosh Vrat 2022: वर्षातलं शेवटचं प्रदोष व्रत आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त

सूर्योदयाची दिशा पूर्व आहे. त्यामुळे जर तुम्ही पूर्वेला उगवत्या सूर्याचे फोटो असलेले कॅलेंडर लावले तर ही दिशा तुम्हाला चांगल्या संधी देईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. यासोबतच पूर्व दिशेला लावलेले कॅलेंडरही मुलाच्या आयुष्यात प्रगतीचे दरवाजे उघडते.

  • असे असावे नवे कॅलेंडर

कॅलेंडर नेहमी असे असावे की त्याचे मख्य पान उगवत्या सूर्याशी किंवा समृद्धीशी संबंधित असेल. हिंसक प्राण्यांचे फोटो, दुःखी चेहऱ्यांची फोटो इत्यादी असलेले कॅलेंडर कधीही लावू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, त्यामुळे असे कोणतेही कॅलेंडर घरात ठेवू नये. नवीन वर्षाचे कॅलेंडर हिरवे, निळे पांढरे, गुलाबी आणि लाल असावे. असे रंगीत कॅलेंडर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

  • या देशात तॅलेंडर लावल्यास येतो पैसा

वास्तूमध्ये उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे नवीन वर्ष 2023 मध्ये सुख, समृद्धी आणि संपत्तीच्या आगमनासाठी उत्तर दिशेला हिरवाई, कारंजे, लग्नाचे फोटो असलेले कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने सुख-समृद्धी वाढते.

  • या दिशेला लावणे मानले जाते अशुभ

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही मुख्य दरवाजावर किंवा दरवाजासमोर लावू नये. जर घर दक्षिणाभिमुख असेल तर मुख्य दरवाजावर कॅलेंडर लावले जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. कॅलेंडर चुकीच्या दिशेने ठेवल्याने तुमची प्रगतीही थांबू शकते. तसेच कधीही दारामागे कॅलेंडर लावू नये. जर असे केले तर त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com