Vastu Tips: सकाळी उठल्यानंतर कधीही पाहू नका या 5 गोष्टी, होईल नुकसान
Dainik Gomantak

Vastu Tips: सकाळी उठल्यानंतर कधीही पाहू नका या 5 गोष्टी, होईल नुकसान

Published on

सकाळी उठल्यावर लोकांचे हात पाहावेत असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. यासोबतच कराग्रे वसते लक्ष्मी मंत्राचा जप करावा. परंतु चुकीच्या माहितीमुळे लोक सकाळी उठतात आणि अशा काही गोष्टी पाहतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब जातो व जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी पाहू नयेत या गोष्टींची सर्वांना माहिती असायला हवी.

1. सकाळी उठून बंद घड्याळाकडे बघू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे म्हणतात की बंद घड्याळ पाहणे जीवनाच्या प्रगतीत अडथळा आणू शकते.

2. सकाळी उठल्यावर आरशातही पाहू नये. जरी काही लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी आरसा पाहिल्याने दिवस चांगला जातो, परंतु वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दिवस खराब जाऊ शकतो. तसेच, जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Vastu Tips: सकाळी उठल्यानंतर कधीही पाहू नका या 5 गोष्टी, होईल नुकसान
PM Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोरोनाची लागण

3. सकाळी उठल्यावर भंगलेली मूर्ती कधीच पाहू नये. असे करणे देखील खूप अशुभ मानले जाते, त्यामुळे घरातील तुटलेल्या वस्तू ताबडतोब काढून टाका.

4. सकाळी उठल्यावर सावलीही दिसू नये. एखाद्या व्यक्तीची किंवा स्वतःची सावली असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जीवनात प्रवेश करते अशी मान्यता आहे.

5. सकाळी उठल्यावर खरकटी भांडी देखील पाहू नयेत. रात्री झोपण्यापूर्वी खरकटी भांडी स्वच्छ करावीत असे सांगितले जाते. सकाळी उठल्यावर खरकटी भांडी दिसल्यानेही चाललेले काम बिघडू शकते.

Vastu Tips: सकाळी उठल्यानंतर कधीही पाहू नका या 5 गोष्टी, होईल नुकसान
UPI Payment: युपीआय पेमेंटसाठी आता मोजावे लागणार पैसे, लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com