श्री नवदुर्गा देवीचे मुळ स्थान

पहिला वर्धापनदिवस 25 मे 2022 रोजी मोठ्या भक्तिभावानं साजरा होणार आहे..
Goa |देवीचे दगडावरील तीन पाऊलांचे ठसे
Goa |देवीचे दगडावरील तीन पाऊलांचे ठसे Dainik Gomantak

-शिवदीप नाईक

सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बाधणी करण्याच्या विचारांवर सध्या मतमतांतरे घडत आहेत. पण देवीने स्थलांतर केलेल्या जागी तिची पुनर्स्थापना करण्याचा विचार फारसा गाजवाजा न करता एका वर्षापुर्वी मंडूर- डोंगरी गावातच्या 'पारपोळीकडेन ह्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी कृतीत आणून दाखविला.

'पारपोळीकडेन' (तिथे भव्य झाड होते) इथं फार जुनी 'पावलां' (पाऊलांचे दगडावरील ठसे) असल्याची ग्रामस्थांना माहिती होती. डोंगरावर जाते वेळी त्या पाऊलांना साफ करून, फुले अर्पण करून एखादा तिथे नमस्कारही करायचा. ही पावले नेमकी कुणाची, हे जाणण्यासाठी पाच गावकऱ्यांनी तिथली ग्रामदेवी ‘श्री जगदंबा षष्ठी शांतादुर्गे’च्या मंदिरात 'प्रसाद' (देवाचा शब्द) घेतला.

Goa |देवीचे दगडावरील तीन पाऊलांचे ठसे
लाचार विश्वगुरू?

मागच्या वर्षी इथल्या ग्रामस्थांनी विचार करून, वैशाख कृष्ण पक्ष दशमीच्या मुहुर्तावर देवीच्या ह्या पाऊलांची विधिवत पूजा केली व तेव्हापासून. दर शुक्रवारी इथे देवीचा दिवस साजरा होऊ लागला.. शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते.. यंदा पहिला वर्धापनदिवस 25 मे 2022 रोजी मोठ्या भक्तिभावानं साजरा होणार आहे..

नवल म्हणजे आई जगदंबेने, ही पाऊले नवदुर्गा गांवशीकांन्नीची असल्याचे सांगितले. गावकरी आश्चर्यचकित झाले कारण ' पारपोळीकडेन', जिथं ही पाऊले सापडली तिथून काही अंतरावरच गांवशी हा गाव आहे आणि इथेच एकेकाळी आई नवदुर्गेचे भव्य मंदिर आणि देवीची तळी देखील होती.

गांवशी गावात निवास असल्याने ह्या देवीला ‘गांवशीकांन्न’ असं नाव पडलं. पुढे 1541 मध्ये जेव्हा पोर्तुगिजांनी गोव्यातील (Goa) मंदिरे नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला. त्यात गांवशी इथलं नवदुर्गेचं मंदिर देखील मोडण्यात आले.

इथल्या काही ग्रामस्थांनी देवीची मूर्ती, मडकई येथील तळेखोल - पारांपाई येथे प्रथम 'बंदरार' (बंदिरवाडा) व नंतर सटीखांब मार्गे, एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान 1541 मध्ये मडकईला स्थलांतरित केली. आज मडकई गावात वसलेलं भव्य मंदिर (Temple) हे मुळ गांवशी इथल्या नवदुर्गा देवीचे. गांवशी गावात आजदेखील देवीच्या मंदिराचे काही अवशेष व देवीची तळी जिर्णावस्थेत पहावयास मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com