National Chocolate Pudding Day: घरीच एग्लेस चॉकलेट पुडिंग तयार करुन साजरा करा हा गोड दिवस

राष्ट्रीय चॉकलेट पुडिंग डे हा दरवर्षी २६ जूनला साजरा केला जातो.
National Chocolate Pudding Day
National Chocolate Pudding DayDainik Gomantak
Published on
Updated on

National Chocolate Pudding Day 2023: दरवर्षी २६ जून हा दिवस राष्ट्रीय चॉकलेट पुडिंग म्हणून सादरा केला जातो. विशिष्ट खाद्यपदार्थ साजरे करण्याचा आणि कौतुक करण्याचा एक मजेदार मार्ग म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय चॉकलेट पुडिंग डे हे चॉकलेट आणि डेझर्ट प्रेमींसाठी महत्त्वाचा आहे. ज्यांना चॉकलेट खुप आवडते ते लोक या दिवसाचा आनंद घेतात. या दिवसानिमित्त घरीच चॉकलेट पुडिंग बनवून या डेझर्टचा आनंद घेऊन साजरा केरु शकता.

एग्लेस चॉकलेट पुडिंग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

दूध - दीड कप

कोको पावडर - 2टेस्पून

साखर - 1/4 कप

कॉर्न फ्लोअर - 1/4 कप

क्रीम - 1/2 कप

चॉकलेट चिप - 1/2 कप

व्हॅनिला इसेसन्स - 1 टीस्पून

मीठ - 1/4 टीस्पून

National Chocolate Pudding Day
Weight Loss Journey: वजन कमी करायचय? मग सर्वात आधी सकाळच्या 'या' 6 सवयी बदला
  • जाणून घ्या रेसिपी

चॉकलेट पुडिंग बनवण्यासाठी र्वात पहिले एका मोठ्या भांड्यात एक कप दूध घालावे आणि त्यात 2 चमचे कोको पावडर आणि 2 चमचे कॉर्न फ्लोअर टाकून मिक्स करावे.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉर्नफ्लोअर ऐवजी कस्टर्ड पावडर घालू शकता. हे मिश्रण चांगले एकजीव करावे. आता एक पॅन घ्या आणि त्यात अर्धा कप दूध घाला. तयार मिश्रण दुधात घाला. आता मंद आचेवर ढवळत शिजवा.

मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यात साखर टाकावी. आता मिश्रणात क्रीम घाला आणि मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत हलवा. आता त्यात चॉकलेट चिप मिक्स करा आणि चॉकलेट चिप पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळत राहा. आता गॅसची मंद करा आणि मिश्रण घट्ट आणि चमकदार होईपर्यंत शिजू द्या.

आता गॅस बंद करा आणि त्यात व्हॅनिला इसेन्स आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण एका लहान कपमध्ये ओता आणि झाकून ठेवा. आता त्यांना किमान 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे घरीच तुमची स्वादिष्ट चोको पुडिंग तयार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com