Goan Traditional Jewellery: नक्की ट्राय कारा; गोवन स्टाईलचे हे पारंपरिक दागिने

Goan Traditional Jewellery: तुम्ही युनिक दागिने घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की वाचाच गोवन स्टाईलचे पारंपरिक दागिने कोणते?
Goan Traditional Jewellery
Goan Traditional JewelleryDainik Gomantak
Published on
Updated on

Goan Traditional Jewellery: दागिने कुणाला आवडत नाही अशी कोणतीही स्त्रीही मिळणार नाही. आज पारंपरिक व अधिक वजनाच्या दागिन्यांची जागा नाजूक दागिन्यांनी घेतलेली आहे. तरी लग्न सण समारंभात अशा पारंपरिक दागिन्यांना महिला अधिक पसंती देताना आपल्याला पहायला मिळते.

Goan Traditional Jewellery
Goa Farmer: शेतजमीन पूर्ववत करून द्या; शेतकऱ्यांची मागणी

गोव्यातील सोन्याच्या दागिन्यांना सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्व आहे. गोव्याच्या सोन्याच्या दागिन्यांच्या काही लोकप्रिय प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणेः

मंगळसूत्र- हा दागिना फक्त सुवासिनी महिलाच वापरतात म्हणून त्याला सौभाग्यलंकार म्हणतात. गोव्यातील महिलांच्या मंगळसूत्रात काळे व सोन्याचे मणी असतात पण सोन्याच्या वाटी ऐवजी ते सोन्याचा मणी व बाजूला एक एक पोवळा मणी वापरतात किंवा लक्ष्मीच्या कॉईनचे पेंडेन्ट वापरता.

कॉईन बॅगल्स - अचूक आकृतिबंध, रंगीत किंवा सोन्याच्या मण्यांचे आकृतिबंध आणि कॉईन्स बनवलेल्या असतात. या नाण्यांवर केळबाई, ब्रम्हिणी माई, वेताळ, महिषासुरमर्दिनी अशा गोव्याच्या वनदेवतांच्या धार्मिक व्यक्तिमत्वाची चिन्हे आपल्याला पहायला मिळतात.

पिचोडी- गोव्यातील पारंपरिक दागिन्यातील पिचोडी आज नववधू व तरुणी मध्ये सूध्दा तितकीच लोकप्रिय आहे. पिचोडीतील वेगळेपण म्हणचे याची एक बाजू प्लेन असते व दुसऱ्या बाजूला डिझाईन केलेली असते.

गोठ- कारागिरांनी तयार केलेल्या फुलांच्या पॅटर्नमध्यील ही गोठची डिझाईन स्त्रियांना आकर्षित करते.. डिझाईनमध्ये स्लीक आणि नाजूक असलेले गोठ कोंकणी स्त्रिया दररोज परिधान करतात.

तोडे- अत्यंत नाजूक गुंतागुंतीचे अचूक पद्धतीने तयार केलेल्या सुंदर बांगड्या म्हणजे तोडे. हे तोडे वजन अधिक असते.

पिड्‍डूकाच्या बॅंगल्स-

या पारंपरिक डिझाईनमध्य काळे मणी, पोवळा (आरेंज), मोती या रंगांच्या मण्यांचे संयोजन असलेल्या मध्ये सोन्याच्या मोटिफ्सने बनवलेल्या असतात. यात सर्वात जास्त प्रसिध्द आहेत त्या काळे मण्यांच्या बांगड्या यांना सुवासिनी बांगड्या देखील म्हटले जाते. या वजनाने हलक्या असल्यामुळे तुम्ही जास्त वेळ परिधान करू शकतात. गोव्यातील स्थानिक गोल्ड ज्वेलरी शॉप मध्ये तुम्ही या खरेदी करू शकता.

गळसरी (Necklace)

हा नाण्याचा हार आहे. पारंपारिक गळसरीमध्ये सोन्याच्या साखळीत किंवा (धागा बांधून) कोरल आणि सोन्याचे मणी आणि सोन्याची नाणी करून तयार केलेला असतो.या नाण्यांवर केळबाई, ब्रम्हिणी माई, वेताळ, महिषासुरमर्दिनी अशा गोव्याच्या वनदेवतांच्या धार्मिक व्यक्तिमत्वाची चिन्हांनी पॅटर्न वापरून सजलेली ही गळसरी गळसरी हा गोव्याच्या नववधूचा गळ्यातील महत्त्वाचा दागिना असतो.

Goan Traditional Jewellery
Goa Police: सोने तस्करीची पोलिसांकडून गंभीर दखल

पाके - (ear cuffs) पाके हे कोंकणी डिझाईन्सचा पॅटर्न वापरून तयार केलेले हे पारंपारिक इयरकफ आहेत. पारंपारिक पाकेची एक जोडी सोन्यापासून बनविली जाते आणि त्यात मोत्यांसह फुलांचे पॅटर्न असतात आणि जाळीसारखे पॅटर्न बनवले जातात.

बाजू बंद ( armlet) गोव्याचा पारंपरिक बाजूबंद हा पूर्णपणे सोन्याचा वापर करून बनविलेला असतो. यातील फुलाचे व मोराचे पॅटर्न स्‍थानिक कारागिरांनी अचूक रित्या तयार केलेले असतात.

सोन्याच्या फुलांची वेणी

सोन्याच्या फुलांची वेणी( आटी)- यात कारागिर सोन्याच्या छोट्या छोट्या पाच फुलांची वेणीचा पॅटर्न करून यु आकाराच्या हेअरपिनमध्ये अचूकतेने लावले जाते. आका केला जातो. उदाहरणार्थ चाफ्याची फुलांची वेणी (आटी), मोगऱ्याची फुलांची वेणी (आटी), कडकड्या फुलांची वेणी (आटी) म्हणतात.हा दागिना कमी वजनात देखील बनवला जातो. लग्न- सण व पूजा कार्यक्रमात महिला आपल्या हेअर स्टाईलमध्ये किंवा अंबाड्यात ही वेणी घालतात त्याचप्रमाणे सिंगल सोन्याचे मोगऱ्याचे फुल देखील केसात घालताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com