आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यापासून होत असते, यासाठी सकाळी चांगल्या गोष्टी आपल्या निदर्शनास येणं गरजेचं आहे. जर आपली सकाळ खराब झाली तर संपूर्ण दिवसही खराब जातो. वास्तुशास्त्रानुसार सकाळपासून काही गोष्टी पाहिल्या किंवा न पाहिल्याने आपला दिवस कसा जाईल याचा अंदाज बांधता येतो. अशाच काही गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी काहीजण सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घेतात. पण, देवाच्या नावासोबतच काही गोष्टींकडे पाहणेही टाळावे, ज्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो.
सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहू नका (Mirror)
सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये. सकाळी आरसा पाहणे अशुभ मानले जाते. सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहिल्याने दिवसभर तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता येते. त्याचा परिणाम दिवसभराच्या कामावर दिसून येतो.
गलिच्छ पदार्थ पाहू नका (Unwashed Utensiles)
अस्वच्छ स्वयंपाकघर असल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि रात्री स्वयंपाकघर गलिच्छ राहिल्यास सकाळपासून घाण भांडी दिसतात आणि आपल्यात नकारात्मकता येते.
सावली पाहू नका (Shadow)
सकाळी उठल्यावर आपली किंवा इतर कोणाचीही सावली पाहू नये. सकाळी उठण्यापूर्वी सावली दिसली तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येतो. दिवसभर तणाव, भीती, राग अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अंथरुणातून उठल्यानंतर पहिल्यांदा सावली कधीही पाहू नये.
बंद घड्याळ (Unactive Clock)
वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ नेहमी अशुभ मानले जाते, पण जर ते झोपेतून उठल्याबरोबर तुमच्या नजरेस पडले तर ते जास्त अशुभ असते. त्यामुळे घरात जी काही घड्याळं आहेत ती बंद न पाहण्याचा प्रयत्न करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.