Goa Beach|वास्को येथे 'आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिन उत्साहात साजरा

सर्वांनी स्वच्छ सागर,सुरक्षित सागर अभियानात सहभाग दाखवावा असे आवाहन मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधिक्षक राजेश कुमार यांनी केले.
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा राज्य पर्यटकांचे आकर्षण केंद्र असल्याने येथील समुद्र किनारे स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी स्वच्छ सागर,सुरक्षित सागर अभियानात सहभाग दाखवावा असे आवाहन मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधिक्षक राजेश कुमार यांनी केले.

(International Beach Cleanup Day celebrated with enthusiasm at Vasco)

Goa Beach
Goa Politics| भाजपच्या विरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाची आझाद मैदानावर निदर्शने

वास्को बायणा समुद्र किनारी राज्य सरकार तर्फे आयोजित 'आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुरगाव, वास्को पोलिस स्थानकांच्या पोलिसा तर्फे बायणा समुद्र किनार्‍यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधिक्षक राजेश कुमार, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक, मुरगाव पोलिस निरीक्षक राघोबा कामत, वास्को वाहतुक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक स्टेनली गोम्स, उपनिरीक्षक उदय साळुंके, हवालदार दामू मयेकर, अजित परब, प्रमेश शिट्टीकर,पुरुषोत्तम नाईक, सुनिल वारखंडकर,हेमतुल्ला खान व इतर पोलिस कर्मचार्‍यानी समुद्र किनारा स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

पुढे बोलताना उपअधिक्षक राजेश कुमार म्हणाले कि, गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवल्यास याचा पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने फायदा होईल. यासाठी सर्वानी आपल्या समुद्राचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपअधिक्षक कुमार यांनी केले. यावेळी वास्को पोलिस निरीक्षक नायक,मुरगाव पोलिस निरीक्षक कामत, वाहतुक पोलिस निरीक्षक नार्वेकर यांच्यानी स्वच्छते विषयी आपले विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com