Healthy Tips: आजकाल धावपळीच्या जगात कोणाकडे वेळच आहे. त्यामुळे प्रत्येक कामात घाई असते. आपल्याजवळ इतका वेळ नसतो की जेवतांनाही आपण घाई दाखवतो.
कोणताही पदार्थ खातांना नेहमी एकएक घास चावून खाल्ले पाहिजे असे घरातील मोठे लोक सांगत असतात पण आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदात हळूहळू आणि चाऊन खाण्याचा सल्ला दिला आहे.
विज्ञान देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. विज्ञानानुसार पदार्थ घाईघाईथ खाल्ल्याने अन्नासोबत हवाही शरीरात पोहोचते. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या सुरू होते. जर तुम्हीही घाईघाईत खात असाल तर तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.
पचननाशी संबंधित आजार
घाईत खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण घाईत खातो तेव्हा आपण मोठे तुकडे उचलतो. ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अपचनाची होऊन पोटाच्या समस्या निर्माण होतात.
खाल्याने पोट भरत नाही
जेव्हा तुम्ही घाईत खाता तेव्हा तुमचे पोट अन्नाने भरले तरी तुमचे मन तृप्त होत नाही. यामुळेच काही लोक अनेकवेळा पोट भरूनही जेवत राहतात. त्याचा परिणाम वजनावर दिसू लागतो आणि लठ्ठपणा वाढू लागतो.
वजन वाढणे
तज्ञांच्या मते जेव्हा आपण जेवतो तेव्हा मेंदू 20 मिनिटांनंतर पोट भरल्याचा सिग्नल पाठवतो. जेव्हा अन्न पटकन खाल्ले जाते, तेव्हा मेंदू हा सिग्नल विलंबाने पाठवतो, ज्यामुळे जास्त जेवतो. त्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.
मधुमेह
एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, घाईत खाणाऱ्यांना मंद खाणाऱ्यांच्या तुलनेत अडीच पट जास्त मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी खालावते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
इन्सुलिन प्रतिकार
घाईत खाणाऱ्यांच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी बिघडते. त्यामुळे चयापचय समस्या वाढू लागतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही असतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.