Poha Health Benefits: पोहे फक्त तुमच्या जिभेची चवच पुरवत नाहीत तर शरीराला देतात 'हे' फायदेही; सविस्तर वाचा

पोहे हा भारतातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे
Poha Health Benefits
Poha Health BenefitsDainik Gomantak

Poha Health Benefits: पोहे हा भारतातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. हे चवदार तसेच पौष्टिक अन्न आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पोहे खाल्ले असतील. पण आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहोत. पोहे खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. तुमच्या नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे ज्यामुळे तुम्हाला पोट भरते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे.

Poha Health Benefits
Vastu Tips For Couple: नवरा-बायकोमध्ये सतत वाद असू शकते वास्तूदोषाचे कारण; इथे वाचा

एनर्जी मिळते

सकाळी नाश्त्यात पोहे खाल्ले तर तुम्ही दिवसभर उत्साही राहता. पोह्यात कार्बोहायड्रेट्स आढळतात जे शरीराला एनर्जी देण्यास मदत करतात. नाश्त्यात एक प्लेट पोहे खाल्ल्याने दिवसभर उत्साही असता.

बीपी नियंत्रित करते

बीपीच्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर ठरू शकते. पोह्यात भरपूर फायबर असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

पचनासाठी चांगले

पोहे हे अतिशय चांगले प्रोबायोटिक अन्न आहे. हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फायबर्समुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते.

जी खाल्ल्याने तुम्हाला अपचन किंवा पोट फुगण्याची समस्या होत नाही. पोहे संध्याकाळी किंवा सकाळी हलका नाश्ता म्हणून खाल्ले जाऊ शकते.

मजबूत रोगप्रतिकारशक्ती

पोहे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. याच्या मदतीने शरीराला प्रोटीन, आयर्न आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. पोहे खाल्ल्याने तुम्ही लोहाच्या कमतरतेवर मात करू शकता. यामुळे अॅनिमिया होण्याचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यात उपयुक्त

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर अशावेळी पोहे मदत करू शकतात. पोहे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. पोह्यांची एक चतुर्थांश प्लेट पुरेशी आहे. इतके पोहे खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरल्यासारखे राहते, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही जास्त खाणे टाळता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com