Morning Breakfast : या महामारीच्या काळात स्वतःच्या आरोग्यामची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे दिवसभरात तुम्ही कोणता आहार घेता हे देखील महत्वाचे ठरते. यात सकाळच्या नाश्ता (Breakfast) अधिक महत्व दिले गेलेले आहे. म्हणून फक्त जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ नको, तर आरोग्याचा देखील हवा. सकाळचा नाश्ता (Breakfast) करणे खूप गरजेचे आहे. परंतु नाश्तात पुरी भाजी , मेन्दू वडे , असे जाड पदार्थ खाल्यास आरोग्यास लाभदायी नसते. आठवडाभर नाश्त्यात जड पदार्थ न खाता कधी कधी हलके फुलके पदार्थ देखील नाश्त्यात बनवावे. रोज रोज तरी काय नाश्ता बनवावा हा देखिल प्रश्न असतोस. जाणून घेउया असेच पोषक आणि पचायला हलके असणारे पदार्थ. (Morning Breakfast: Nutritious and easy to digest)
ब्राऊन ब्रेड सॅण्डविच :
नाश्ताला ब्रेडचे पदार्थ खायला सर्वानाच आवडतं. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वाना ब्रेडचे पदार्थ आवडत. यामुळे ब्रेडचे पदार्थ खायायाची हौस भागवायची असेल तर ब्राऊन ब्रेड सॅन्डविच करावं. बटाटाचे सारण भरून सॅन्डविच मेकर मध्ये भाजून करता येऊ शकते. तसेच हिरवी पुदिना - कोथिंबीर चटणी आणि हिरव्या भाज्यांच्या वापर करुन सॅन्डविच करता येतात. ब्राऊन ब्रेडचा सॅन्डविच खायला चवदार असतो.
मोड आलेल्या कडधान्यांची चाट :
मोड आलेले कडधान्य आरोग्यास लाभदायी असताता. तसेच यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुरळीत ठेवण्यास मदत करते. स्प्राउट चाट खायला चवदार देखील असते . कोणतेही मोड आलेले कडधान्य घेऊन कुकरमध्ये शिट्टी करून घ्यावी. त्यात कांदा, टमाटर , हिरवी मिरची , चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून खावे. यात मिरे पावडर व लिंबाचा रस टाकला की अधिक चव वाढून पोषणमुल्यत वाढ होते.
फळांचा रायता :
फळ आरोग्यास नेहमीच लाभदायी असतात. दही आणि फळ यांचे मिश्रण भूक भागवण्यास मदत करते म्हणून सकाळच्या नाश्त्यात फळांचा रायता घेणे लाभदायी ठरू शकते. यामुळे शरीरास भरपूर ऊर्जा मिळते. यात फॅटचे प्रमाण कमी असून अँण्टि ऑक्सिडण्टस मुबलक प्रमाणात असते. दही आणि फळ यांचे मिश्रण खाल्ल्याने ह्रदयाचे आरोग्यास चांगले ठेवण्यास मदत मिळते. यासाठी दही , साखर, संत्री , सफरचंद डाळिंब हे फळ घ्यावीत.
ओटसचा उपमा :
निरोगी आरोग्याच्या दृष्टीने ओट्स खाणे खूप चांगले मानले जाते. सकाळच्या नाश्त्यामध्ये करून खाता येतात. यात तंतुमय घटकांचा समावेश असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते. ओट्स आणि फळ असे मिश्रण उत्तम मानले जाते. ओट्समध्ये भाज्या ,मीठ ,मसाले टाकून मसाला ओटस करू शकता. यालाच ओट्सचा उपमा म्हणतात. तसेच ओट्सची इडली देखील तयार करता येते. ओटस , थोडा रावा, दही , आणि भाज्या बारीक करून ते इडलीच्या मिश्रणासारखे तयार करून इडल्या करून खाता येतात.
मिश्र धान्यांची इडली :
मिश्र धान्यच्या इडलीमध्ये ज्वारी,बाजरी, गहू यांचे मिश्रण करून पीठ तयार करावे. उडदाची डाळ दोन तास भिजवून मिक्सर मधून वाटून घावी. हे पीठ आंबवून त्याच्या इडल्या करता येतात. या इडलीमधून या धान्याचे सत्वें पोटात जातात. हि ईडाली बनवणे रिशया सोपी असते. यातील पोषण घटक आणि चव वाढविण्यासाठी त्यात अनेक भाज्या बारीक चिरून टाकता येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.