Rainy Season Travel Guide: पावसाळ्यात ट्रिप प्लॅन करताय? 'या' चुका टाळा, अनुभव होईल अविस्मरणीय

Monsoon Trip Tips: पावसाळा म्हणजे डोंगरावरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडं, कुजबुजणाऱ्या नद्या आणि मातीच्या सुवासाने भरलेलं वातावरण. मात्र, फिरायला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Rainy Season Travel Guide
Rainy Season Travel GuideDainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळा म्हणजे डोंगरावरून वाहणारे धबधबे, हिरवीगार झाडं, कुजबुजणाऱ्या नद्या आणि मातीच्या सुवासाने भरलेलं वातावरण. हे सगळं अनुभवण्यासाठी पावसात एक ट्रिप करणं ही कल्पना कितीही छान वाटत असली, तरी योग्य तयारी नसेल तर ती डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे पावसात ट्रिप करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया, पावसात ट्रिप करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

पावसाळ्यात सगळीकडेच प्रवास करणं शक्य नाही. काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो, काही ठिकाणी रस्ते खराब होतात. त्यामुळे ट्रिपसाठी हिल स्टेशन किंवा जंगल क्षेत्र निवडताना त्या ठिकाणचं हवामान आणि सुरक्षा स्थिती तपासूनच निर्णय घ्या. महाबळेश्वर, भंडारा डोंगर, आंबोली, कोकणातील काही समुद्रकिनारे हे पावसात सुंदर वाटतात पण सुरक्षितता महत्त्वाची आहे.

Rainy Season Travel Guide
Goa Accidents: गोव्यात एप्रिल महिन्यात 26 जणांचा अपघाती मृत्यू! ही मालिका कधी संपणार?

पावसाळ्यात वाहनाची अडचण तुमच्या संपूर्ण ट्रिपवर पाणी फेरू शकते. त्यामुळे वाहन पूर्णपणे तपासूनच निघा. चाकांची पकड, ब्रेक्स, वायपर आणि लाईट्स नीट चालू आहेत का हे तपासा. शक्य असल्यास SUV किंवा ग्राउंड क्लीयरन्स जास्त असलेली गाडी निवडा.

उपयोगी वस्तू विसरू नका

पावसात ट्रिप करताना ही काही वस्तू सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. मजबूत रेनकोट किंवा वॉटरप्रूफ जॅकेट, छत्री, वॉटरप्रूफ बॅग कव्हर, पॉलिथीन बॅग्स – मोबाइल, कॅमेरा, डॉक्युमेंट्ससाठी, अँटी-स्लिप शूज, थोडे ड्राय स्नॅक्स आणि गरम पेय.

पावसात अचानक हॉटेल शोधणं आणि मिळणं कठीण असू शकतं, विशेषतः टूरिस्ट सीझनमध्ये. शिवाय भिजलेल्या स्थितीत फिरत हॉटेल शोधणं त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे इंटरनेटवर रिव्ह्यू पाहून आधीच बुकिंग करून ठेवा.

धबधब्याजवळ, पाणथळ जागी किंवा ओले दगड असलेल्या ठिकाणी फोटो क्लिक करताना सतर्क राहा. थोडीशी चूक झाल्यास पाय घसरू शकतो. तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

Rainy Season Travel Guide
Family Trip Destinations: फॅमिली ट्रीपचा प्लॅन करताय? 'ही' आहेत बेस्ट डेस्टिनेशन्स

पावसाळ्यात काही ठिकाणं बंद असतात, काही धोकादायक असतात. त्यामुळे स्थानिक लोकांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही वेळ आणि त्रास वाचवू शकता.

पावसात ट्रिप म्हणजे एक वेगळीच मजा. मात्र योग्य नियोजन आणि काही छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यास ही ट्रिप अविस्मरणीय ठरू शकते. पावसात भिजत भिजत केलेली ट्रेक, धबधब्याखाली घेतलेला शॉवर, गरम गरम भजी आणि चहा – या साऱ्या आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात. त्यामुळे ट्रिप करताना योग्य खबरदारी घ्या, आणि निसर्गाच्या या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com