Manish Jadhav
तुम्ही फॅमिलीबरोबर ट्रीपचा प्लॅन करत आहात का? आम्ही तुम्हाला या वेबस्टोरीच्या माध्यमातून देशातील अशा पाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जावून सुखाची प्राप्ती कराल.
बर्फाच्छादित पर्वत, निळेशार तलाव आणि थरारक रस्ते प्रवासासाठी लेह-लडाख प्रसिद्ध आहे. येथील पॅन्गॉन्ग लेक, नुब्रा व्हॅली, मॅग्नेटिक हिल, खारदुंग ला पास या ठिकाणांना तुम्ही जरुर भेट दिली पाहिजे.
सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाइफ, वॉटर स्पोर्ट्स आणि ऐतिहासिक चर्चेससाठी गोवा प्रसिद्ध आहे. बागा, अंजुना, तसेच दूधसागर धबधबा या ठिकाणांना भेट देवून सुखावून जाल.Kerala
दरवर्षी मोठ्याप्रमाणात लोक केरळला भेट देतात. येथील अलेप्पी हाऊसबोट सफर, मुन्नारच्या चहाच्या मळ्यांचा नजारा, समुद्रकिनारे आणि पेरियार नॅशनल पार्कसह इतर प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
पर्वतीय सौंदर्य, ट्रेकिंग आणि स्नोफॉलसाठी हिमाचल प्रदेश बेस्ट डेस्टिनेशन आहे. मनाली (सोलांग व्हॅली, रोहतांग पास), शिमला (मॉल रोड, कुफरी), धर्मशाळा (मॅक्लॉडगंज), कसोल (पार्वती व्हॅली) पर्यटक या ठिकाणांना भेट देणे पसंत करतात.
स्वच्छ निळे समुद्र, प्रवाळद्वीप आणि स्कुबा डायव्हिंगसाठी अंदमान आणि निकोबार बेटे प्रसिद्ध आहेत. येथील हॅवलॉक आयलंड (राधानगर बीच), नील आयलंड, सेल्युलर जेल, भरतांग लाइमस्टोन केव्हज पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्यासंख्येने येतात.