Monsoon Dengue Fever: पावसाळा सुरू झाला आहे आणि या दिवसांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. साचलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्णही वाढतात. जे डासांचे उत्पत्तीस्थान बनते.
डेंग्यूचा विषाणू संक्रमित एडिस डासांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. याचा जगभरातील लाखो लोकांवर परिणाम होतो.
ज्यामध्ये लहान मुले देखील या आझाराला बळी पडू शकतात. डेंग्यूपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे हा जाणून घेऊया.
डेंग्यूची लक्षणे कोणती (Dengue Fever Symptoms)
खूप ताप
तीव्र डोकेदुखी
सांधे आणि स्नायू दुखणे
पुरळ येणे
थकवा जाणवणे
स्वच्छता ठेवावी
डेंग्यूचा प्राथमिक स्त्रोत असलेल्या एडिस डासांची वाढ साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. तुमच्या घरात डासांच्या उत्पत्तीचा धोका कमी करण्यासाठी घरातील साचलेले पाणी काढून टाकावे. तसेच नाला आणि पाण्याचे नळ स्वच्छ करा.
कीटकनाशके वापरा
त्वचेचे डासांपासून रंक्षण करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट क्रीम लावल्याने डास चावण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. तुमच्या परिसरात किंवा घरात जास्त डास असतील तर मच्छर प्रतिबंधक वापरावे.
पूर्ण बाह्यांचे कपडे घाला
तुमच्या मुलांसोबत तुम्हीही लांब बाहींचा शर्ट, लांब पँट, मोजे घालावे. त्याचबरोबर हलक्या रंगाचे कपडे घालावे यामुळे डास जवळ येत नाही
खिडक्या आणि दारे बंद करा
घरात डास येऊ नयेत म्हणून खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे. तसेच मच्छरदाणीचा वापर करावा. डासांपासून संरक्षण करण्याचे हे सर्वोत्तम मार्ग असू शकतात. तसेच, घरामध्ये थंड वातावरण राखण्यासाठी पंखे किंवा वातानुकूलन वापरा कारण थंड वातावरणात डासांची क्रिया कमी होते.
बाहेर जाणे टाळा
संध्याकाळी जेव्हा डास जास्त सक्रिय असतात तेव्हा बाहेर किंवा पाणी असलेल्या भागात जाणे टाळा. आवश्यक असल्यास, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मच्छर प्रतिबंधक लावा.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
तुमच्या घरात जर एखाद्याला खूप ताप, डोकेदुखी किंवा सतत उलट्या होत असतील तर ते डेंग्यूचे लक्षण असू शकते. अशावेळी डेंग्यूची गंभीर वाढ होण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.