Monsoon Clothes Care: पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी दूर करण्यासाठी फॉलो करा 'हे' 5 सोपे उपाय

पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांमधून दुर्गंधी येऊ लागते जी अनेक वेळा धुवूनही निघत नाही. पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे कपड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
Monsoon Clothes Care
Monsoon Clothes CareDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Clothes Care: पावसाळा सुरू झाला असून पावसाने उन्हापासून थोडासा दिलासा मिळायला सुरुवात केली आहे. पण दुसरीकडे काही समस्याही सुरू झाल्या आहेत. पावसामुळे हवा व सूर्यप्रकाश घरात जात नसल्याने बंद ठिकाणी दुर्गंधी येऊ लागते. यासोबतच कपड्यांनाही वास येऊ लागतो. एखाद्याने आपले कपडे कितीही चांगले धुतले तरी, पावसाळ्यात ते चांगले ठेवणे आणि दुर्गंधीपासून बचाव करणे अवघड असते.

पावसाळ्यात (Monsoon) वाढलेली आर्द्रता आणि घाम यामुळे हा कपड्यांना वास येतो. कपड्यांमधून असा वास येत असल्याने लोकांना मान्सून स्टाईल फॉलो करता येत नाही. पण तुम्ही काही टिप्स वापरून पावसाळ्यात कपड्यांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता.

  • कपडे जमा करून ठेऊ नका

बहुतेक लोक त्यांचे रोजचे कपडे धुण्यासाठी एका पिशवीत किंवा वॉशिंग मशिनमध्ये जमा करून ठेवतात. पावसाळ्यात कपडे बंद ठिकाणी ठेवल्याने वास येतो, जो धुतल्यानंतरही जात नाही. म्हणूनच दोरीवर कपडे वेगळे ठेवा आणि धुतल्यानंतर ते मशीनने वाळवे.

Monsoon Clothes Care
Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज खा 'हे' 6 ड्रायफ्रुट्स, काही दिवसातच दिसेल रिझल्ट
  • नियमितपणे कपडे धुवावे 

ओले आणि खराब कपडे आजूबाजूला ठेवू नका. जितक्या लवकर तुम्ही ते धुवाल तितक्या कपड्यांना दुर्गंधी कमी होईल म्हणून कपडे नियमित धुवावे.

  • व्हिनेगर, बेकिंग सोडा वापरा 

तुमची नियमित वॉशिंग पावडर कपड्यांमधून येणारा वास दूर करू शकत नाही. यासाठी तुमच्या डिटर्जंटसोबत पाण्यात थोडा व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांमधून दुर्गंधी येणार नाही.

  • घरात कपडे वाळवावे

जर सतत पाऊस पडत असेल आणि तुम्ही तुमचे कपडे धुतले असतील तर पाऊस कमी होण्याची वाट पाहू नका. कपडे पसरून घरातील पंख्याच्या हवेत वाळवा. सूर्य बाहेर आल्यावर कपडे उन्हात वाळवा.

  • लिंबाच्या रस

तुम्ही ज्या पाण्यात कपडे भिजवत आहात त्यात लिंबाचा रस देखील टाकू शकता. यामुळे वास येणार नाही आणि कपडे फ्रेश राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com