Monsoon Care: पावसाळ्यात कपड्यांवर लागलेले डाग काढण्यासाठी वापरा 'या' भन्नाट ट्रिक्स

पावसळ्यात कपडे ओले राहिले की त्यावर बुरशीचे काळे डाग पडतात ते कसे काढालवे हे जाणून घेऊया.
Monsoon Care
Monsoon CareDainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळा सुरू झाला असून अनेक समस्या निर्माण होत आहेत.जसे की पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाही.पावसाळ्यात कपडे बाहेर लवकर सुकत नाही. यामुळे ओले कपडे वाळवण्यासाठी अनेक उपाय शोधून काढावे लागतात.

जर कपडे नीट सुकले नाही तर बुरशी पकडते.यामुळे कपड्यांवर काळसर डाग पडतात. हे डाग लवकर निघत नाहीत. यामुळे महागडे कपडे देखील खराब होऊ शकतात. यामुळे हे डाग कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

  • पावसाळ्यात कपड्यांवरचे डाग कसे काढावे

1. लिंबु आणि मीठ

पावसाळ्यात कपड्यावरचे बुरशीचे काळे डाग काढायचे असेल तर तुम्हीलिंहाचा वापर करू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करावे. ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तेथे हे मित्रण लावावे. थोडे घासून कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

2. कोमट पाण्याने कपडे धुवावे

पासाळ्यात कोमट पाण्याने कपडे धुणे चांगले असते. कपड्याचा कुंबट वास आणि डाग कमी होण्यास मदत होते. असे केल्याने कपड्यावरचे जीवजंतू देकील कमी होतात.

3. बेकिंग सोडा

बेकिंग साड्याचा वापर केल्याने कपड्यावरचे डाग सहज निघून जातात. यासाठी बुरशी असलेल्या भागात किंवा डाग असलेल्या भागावर लावावे. अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर ब्रशने घासून कोमट पाण्याने धुवावे.

4. बोरेक्स पावडर

बोरेक्स पावडर हे असं एक केमिकल आहे ज्यामुळे कपड्यांवरील फंगसचे डाग निघून जातात. यासाठी कपडे धुताना तुमच्या डिटर्जेंटसोबत या पावडरचा वापर करा. 

Monsoon Care
Monsoon Clothes Care: पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी दूर करण्यासाठी फॉलो करा 'हे' 5 सोपे उपाय

5. व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर तुम्ही कपड्यावरचे कोणतेही डाग काढण्यासाठी करू शकता. याचा वापर करण्यासाठी साबणामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि डाग असलेल्या ठिकाणी लावा, सुमारे अर्धा तास ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा.

6. टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो, परंतु टूथपेस्टचा वापर न निघणारे डाग दूर करण्यासाठी केला जातो. डाग असलेल्या टूथपेस्ट लावावे आणि घासावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे.

7. थंड पाणी

पांढऱ्या किंवा हलक्या कपड्यावर डाग असल्यास सर्वप्रथम थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळ धुवा. थंड पाण्याच्या प्रभावामुळे अगदी कडक डाग हलके होतात. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com