Menstrual Hygiene Day: मासिक पाळीत पॅडएवजी वापरा 'या' गोष्टी

मासिक काळात महिलांनी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Menstrual Hygiene Day:
Menstrual Hygiene Day:Dainik Gomantak
Published on
Updated on

Menstrual Hygiene Day: मासिक काळात महिलांनी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात काळजी न घेतल्यास अनेक आजार आणि संसर्गांना सामोरे जावे लागु शकते.

यामुळेच मासिक पाळी स्वच्छता दिवस महिलांना संसर्ग आणि रोगांपासून वाचवण्यासाठी साजरा केला जातो. जे महिलांना आरोग्याबाबत जागरुक होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान सामान्य पॅड वापरत असाल तर ही नवीन उत्पादने देखील जाणून घ्या. जे मासिक पाळीत स्वच्छता ठेवण्यास मदत करेल.

  • पँटी लाइनर्स

मासिक पाळीच्या शेवटच्या दोन दिवसात जेव्हा फ्लो कमी असतो तेव्हा पँटी लाइनर खूप मदत करतात. हे वापरल्याने कपडे खराब होत नाही. टॅम्पन्स किंवा कपसह देखील स्त्रिया कधी कधी पँटी लाइनर वापरतात. जेणेकरून कपड्यांवर डाग पडणार नाही. न

  • पीरियड्स पॅन्टीज

पीरियड्स पॅन्टीज सामान्य इनरवेअर सारखाच असतात. फक्त त्यांचे फॅब्रिक अतिशय मऊ आणि अनेक लेअर, यूनिक फॅब्रिकने बनलेले असतात. ज्याचा वापर बहुतांशी पीरियडच्या शेवटच्या काळात महिला करतात. ते पुन्हा वापरता येतात.

Menstrual Hygiene Day:
Healthy Hair: चमकदार केसांसाठी मेहंदीमध्ये मिक्स करा 'या' गोष्टी
Periods
Periods Dainik Gomantak
  • रियूजेबल पॅड्स

अनेक महिलांना (Women) सॅनिटरी पॅड्समुळे पुरळ आणि रॅशेसच्या समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही पुन्हा वापरता येणारे पॅड वापरु शकता. डॉक्टरही पॅड वापरण्यास नकार देतात. कारण हे पॅड 4/6 तासांपेक्षा जास्त वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.

  • टॅम्पन्स

मासिक पाळीत टॅम्पन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. विशेषत: टॅम्पन्स स्पोर्ट्स वुमन वापरतात. जेणेकरून त्यांना पॅड्समुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवता येईल. विशेषतः ते सोबत घेऊन जाणे खूप सोपे आहे. टॅम्पन वजाइनामध्ये इन्सर्ट केला जातो.

  • मॅन्स्ट्रुअल कप

टॅम्पन प्रमाणेच मॅन्स्ट्रुअल कप देखील वजाइनामध्ये इन्सर्ट करावा लागतो. हा एक प्रकारचा सिलिकॉन कप आहे. जे वजइनाच्या आत मॅन्स्ट्रुअल ब्लड होल्ड करून ठेवते. हे ब्लड फ्लोनुसार सुमारे 4/3 तास होल्ड केले जाते. नंतर बाहेर काढून धुऊन पुन्हा वापरले जाऊ शकते. मॅन्स्ट्रुअल कप वेगवेगळ्या आकारात मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com