Menstrual Cycle: अनियमित मासिक पाळीची 'ही' आहेत कारणे

अनियमित पाळी (Menstrual cycle) येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे महिलांची वाईट जीवनशैली (Lifestyle) आहे.
Menstrual Cycle: These are the causes of irregular menstruation
Menstrual Cycle: These are the causes of irregular menstruationDainik Gomantak
Published on
Updated on

मासिक पाळी (Menstrual cycle) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिलेला 21 ते 20 दिवसांच्या दरम्यान येते. महिलांच्या बदलणाऱ्या हार्मोन्समुळे (Hormones) कधीकधी 5 ते 6 दिवस मासिक पाळीच्या कालावधीत बदल होतो. या काळात महिलांना अशक्तपणा, तणाव यासारखा त्रास होतो. काही महिलांना (Women) नियमित पाळी (Regular menstruation) येते तर अनेकांना अनियमित पाळी (Irregular menstruation) येते. अनियमित पाळी येण्यामागे काय कारणे आहेत ही जाणून घेऊया.

* अनियमित पाळी येण्याचे कारण

अनियमित पाळी येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे महिलांची वाईट जीवनशैली (Lifestyle) आहे. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीवर (Menstrual cycle) परिणाम होतो. यासारखे अनेक कारणे आहेत की ज्यामुळे अनियमित पाळी येते.

* सकस आहाराचा अभाव

महिलांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे. महिलांनी मासिक पाळीदरम्यान पोषक आहार घ्यावा. सकस आहार न घेतल्यास महिलांना अशक्तपणा येतो.

* पुरेशा झोपेचा अभाव

प्रत्येक महिलेने किमान 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच मासिक पाळीदरम्यान पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

* तणाव

जास्त तणावामुळे आपल्या मेंदूवर खोल परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान हार्मोन्समध्ये बदल होतात. यामुळे मासिक पाळी अनियमित येते. जेव्हा तुमच्यावरील ताण कमी होतो तेव्हा नियमित पाळी येण्यास मदत मिळते.

* हार्मोन्सचे असंतुलन

शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास मासिक पाळीवर विपरीत परिणाम होतात. महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स मासिक पाळीवर नियंत्रण ठेवते. परंतु जेव्हा हार्मोन्समध्ये बदल होतात यामुळे पाळी अनियमित येते.

* नियमित पाळी येण्यासाठी करा हे घरगुती उपाय

* गाजराचा रस

गाजरचा रस पिल्याने मासिक पाळी नियमित येण्यास मदत मिळते. यात मुबलक प्रमाणात लोह असते. यामुळे हार्मोन्सचे कार्य सुरळीत चालते. गाजरमध्ये व्हिटॅमिन 'ए' भरपूर प्रमाणात असते. नियमितपने मासिक पाळी येण्यासाठी गाजराच्या रसाचे सेवन करावे.

* पपई

पपईमध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते. पपई खाल्ल्याने मासिक पाळी नियमित येण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com