Health Tips for Men: महिलांप्रमाणे पुरुषांनाही होतो मेनोपॉज? जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

रजोनिवृत्तीचा पुरुषांचा अनुभव स्त्रियांपेक्षा खूप वेगळा असतो. जसजसे वय वाढते तसतसे माणसाची हार्मोन्स तयार करण्याची क्षमताही कमी होते.
Menopause | Health Tips for Men
Menopause | Health Tips for MenDainik Gomantak
Published on
Updated on

Health Tips for Men: मेनोपॉज म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील तो काळ, जेव्हा त्यांना मासिक पाळीच्या प्रक्रियेपासून मुक्ती मिळते. मेनेपॉजनंतर महिलांचे मासिक चक्र कायमचे थांबते. 

या प्रक्रियेदरम्यान महिलांना निद्रानाश, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, सांधेदुखी, मूड बदलणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसे तर मेनोपॉज 45 आणि 55 वर्षांच्या वयात सुरू होते. 

यामध्ये शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन कमी होऊ लागते. जे पीरियड सायकल नियंत्रित करण्याचे काम करतात. आता प्रश्न पडतो की पुरुषांनाही मेनोपॉजच्या समस्येतून जावे लागते का?     

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार पुरुषांचा मेनेपॉजचा अनुभव महिलांपेक्षा (Women) खूप वेगळा असतो. जसजसे वय वाढते तसतशी माणसाची हार्मोन्स तयार करण्याची क्षमताही कमी होते. 

याला 'मेल मेनोपॉज' किंवा एंड्रोपॉज म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे 40 ते 60 वयोगटातील पुरुषांमध्ये सुरू होते. या दरम्यान, टेस्टोस्टेरॉनची पातळी घसरू लागते. यामुळे दाढी, चेहऱ्यावरील केस आणि पुरुषाच्या आरोग्यावर परिणाम करते.

Menopause | Health Tips for Men
Summer Travel Tips: उन्हाळ्यात ट्रेनने लांबचा प्रवास करणार असाल तर 'या' टिप्स येतील कामी
  • 'मेल मेनोपॉज'ची लक्षणे कोणती?

  1. पुरुषांच्या वयानुसार त्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळीही कमी होऊ लागते. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे पुरुषांनाही अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

  2. सर्व पुरुषांमध्ये समान लक्षणे दिसणे आवश्यक नाही. काहींना कमी लक्षणे दिसू शकतात आणि काहींना जास्त असू शकतात. चला जाणून घेऊया पुरुषांमध्ये 'मेल मेनोपॉज'ची लक्षणे कोणती जाणवतात.

  3. रिपोर्टनुसार, 'मेल मेनोपॉज' मधून जात असलेल्या पुरुषाला खूप थकवा जाणवतो. त्याची ऊर्जा कालांतराने कमी होऊ लागते. 

  4. रोजची कामे करण्यात अडचणी येतात. 

  5. शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. 

  6. इतकंच नाही तर त्यांना हॉट फ्लॅशचाही सामना करावा लागतो, ज्यामध्ये शरीरात अचानक उष्णता वाढते.

विशेषत: मान, छाती आणि चेहऱ्यावर जास्त घाम येण्यास सुरूवात होते. हे लक्षण रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये देखील दिसून येते. 

ऑस्टिओपोरोसिसचा धोका का वाढतो!

मेनेपॉज दरम्यान पुरुषांना देखील मूड स्विंग होतात. कधी त्यांना खूप वाईट वाटते, कधी खूप आनंद होतो, कधी उत्साही तर कधी काळजी वाटते. स्नायूंचे संतुलन राखण्यासाठी टेस्टोस्टेरॉन खूप महत्वाचे आहे. 

जेव्हा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते तेव्हा पुरुषांचे स्नायू आणि शारीरिक शक्ती कमी होते. कोणतेही जड काम करणे त्यांच्यासाठी थोडे कठीण होते. टेस्टोस्टेरॉन हाडांची घनता राखण्यासाठी देखील काम करते. पण मेनेरॉजच्या काळात जेव्हा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते तेव्हा त्याचा थेट परिणाम हाडांवरही होतो आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. 

  • कोणती काळजी घ्यावी

साधारण वयाच्या 50 शीनंतर पुरुषांमध्ये मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. ही नैसर्गिक घटना आहे. यात वाईट असे काही नाही. पण हे जर वयाच्या पन्नाशीपूर्वी किंवा तारुण्यात घडू लागले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मेनेपॉजची लक्षणे जाणवू लागल्यानंतर पुरुषांनी हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे. ज्यामध्ये फायबर्स अधिक असतील. याशिवाय नियमीत व्यायाम करणेही आवश्यक आहे. कमीत कमी आठ तास नियमीत झोपही घ्यायला हवी. ताण कमी करण्यासाठी नियमित योगा करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com