Men's Health: स्वयंपाक घरातील 'हे' 5 मसाले पुरुषांसाठी ठरतात वरदान

नियमितपणे पुरूषांनी या मसाल्यांचे सेवन केल्यास अनेक फायदे मिळतील .
cardamom
cardamomDainik Gomantak

Men's Health: आजच्या काळात बहुतेक लोक असंतुलित लाइफस्टाइला बळी आहेत. त्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. सेक्सुअल आरोग्य देखील जपणे गरजेचे आहे. सेक्स करण्याची इच्छा नसणे यासारख्या अनेक सेक्सुअल समस्या निर्माण होतात.यावर कुठेतरी लाइफस्टाइलसह आहाराचा देकील परिणाम होतो. पुरूषांनी स्वयंपाक घरातील काही मसाले नियमितपणे खाल्यास या समस्या कमी होऊ शकतात.

  • मेथी दाणा

NCBI मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मेथीचे दाणे टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्याचे काम करतात. टेस्टोस्टेरॉन हा एक लैंगिक संप्रेरक आहे, जो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळतो आणि लैंगिक कार्य आणि उर्जेसाठी जबाबदार असतो. ज्या लोकांना सेक्सुअल समस्या असतील त्याचे मेथी दाण्याचे सेवन करावे.

  • विलायची

विलायची अनेक पदार्थांमध्ये चव आणि सुगंध देण्याचे काम करते. तसेतच अनेक आरोग्यादायी फायदे देखील आहेत. सेक्सुअल लाइफ सुखी ठेवायची असेल तर तुम्ही विलायची खाऊ शकता. यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत मिळते.

cardamom
Friendship Day Special: 'अशा' लोकांची मैत्री नकोच रे बाबा! नुकसान टाळण्यासाठी रहा चार हात दूर
  • बडीशेप

श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बडीशेपचा वापर करतात. पण खरं तर बडीशेप देखील पुरूषांसाठी पायदेसीर ठरते. तसेच यामध्ये असणारा इस्ट्रोजेन सारखा पदार्थ कामवासना वाढवण्याचे काम करतो.

  • लसूण

लसुण खाल्याने पुरूषांना खुप फायदा होतो. यामुळे नेहमीच्या आहारात लसूण खाणे फायदेशीर असते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

  • आलं

आल्याचे सेवन करून तुम्ही तुमचे सेक्सुअल लाइफ सुधारू शकता. आल्याचे नियमित सेवन केल्याने स्त्री आणि पुरुष दोघांची लैंगिक कार्यक्षमता सुधारते. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.यामुळे निरोगी आरोग्यासाठी आले खाणे फायदेशीर असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com