Health Insurance: शाकाहारी असल्याचा साइड इफेक्ट! इन्शुरन्स कंपनीने मेडिक्लेमच नाकारला

Health: शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामिन बी12 ची कमतरता असू शकते.
Vegetables
VegetablesDainik Gomantak

Health: शाकाहारी असाल तर तुम्हाला विचारात पाडणारी एक गोष्ट सध्या खूप चर्चेत आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीने चक्क शाकाहारी असल्याचे कारण देत मेडिक्सेम नाकारला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तुम्ही शाकाहारी असल्यामुळे आजारी पडला असाल तर मेडिक्लेम स्विकारला जाऊ शकत नाही. पण ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समितीने कंपनीचे म्हणणे फेटाळले आहे. तसेच आजारी व्यक्तीला व्याजासहित मेडिक्लेम देण्याचे आदेश दिले आहेत.

Health
Health Dainik Gomantak

याविषयी ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समितीने सांगितले की, शाकाहारी असणं गुन्हा नाही आणि त्याबाबत इन्शुरन्स (Insuance) कंपनीने लावलेला तर्क चुकीचा आहे. यासंदर्भात मिताली ठक्कर या महिलेने अहमदाबाद येथे ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समितीला तक्रार केली होती. मितालीला खूप अशक्तपणा आला होता, तिचे होमीसिस्टीन लेवल 23.52 झाले होते. जे सामान्यपणे 15 च्या दरम्यान असते. त्यानंतर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये एक आठवडाभर उपचार सुरु होते.

Vegetables
Yoga Poses: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी 5 योगासने

मितालीच्या मेडीकल रिपोर्टनुसार, व्हिटामिन बी12 च्या कमतरतेमुळे तिला या त्रासाला सामोरे जावे लागले. शाकाहारी असल्यामुळे तिच्या शरीरामध्ये व्हिटामिन बी12 ची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली होती. ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समितीने या केसवर सुनावणी करताना म्हटले की, शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामिन (Vitamin) बी12 ची कमतरता असू शकते.

पण यामुळे मितालीला त्रास झाला असेल तर त्यात तिची चूक नाही. तिला आलेले एक लाख रुपये हॉस्पिटल बिल व्याजासहित परत करावे, असा आदेश याप्रकरणी ग्राहक हक्क संरक्षण समितीकडून देण्यात आला.

या केसबाबत पुढे समितीने सांगितले की, मिताली ठक्करला झालेला मानसिक त्रास आणि न्यायविषयक लागलेल्या खर्चाची भरपाई इन्शुरन्स कंपनीने व्याज म्हणून दिलेला पैसा असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com