Healthy Tips: औषधासह या पदार्थांचे सेवन करणे ठरु शकते जीवघेणे

असे अनेक पदार्थ आहेत जे औषधाचा प्रभाव कमी करु शकतात.
Medicine Side Effects
Medicine Side EffectsDainik Gomantak
Published on
Updated on

Medicine Side Effects: आजारी पडणे आणि बरे होणे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. विषाणू, बॅक्टेरिया आणि इतर रोगजनक परजीवी शरीरात प्रवेश करतात, शरीरात थकवा, शरीरातील उष्णता यांसारखी लक्षणे दिसू लागतात. 

हे आजारी असण्याचे लक्षण आहे. जसे तुम्ही औषध घेतात किंवा रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच कार्य करते तेव्हा ते या जीवाणू, विषाणूंना मारण्यास सुरुवात करते. रुग्णांना बरे वाटते. साधारणपणे, कोणतीही व्यक्ती आजारी असताना औषध घेते. पण औषध वेळेवर घेणे गरजेचे नाही, औषधासोबत काय खाताय हे तुम्हाला माहीत आहे का? याची काळजी घेणेही गरजेचे आहे. औषधासोबत काही गोष्टी खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होउ शकतो.

औषधासह काय खाऊ नये

  • संत्र्याचा रस पिऊ नका

तुम्ही औषध घेत असाल तर लगेच संत्र्याचा रस पिऊ नये. असे मानले जाते आणि अनेक अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की संत्र्याचा रस घेतल्याने औषध शरीरात विरघळण्याची वेळ वाढते. त्यामुळे औषध उशीरा प्रभावी होते. व्हिटॅमिन सी असलेली उत्पादने औषधाचे विघटन करण्यास विलंब करतात. 

  • कॅफिनयुक्त पेये पिऊ नका

कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक्समध्येही कॅफिनचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत औषधासोबत कॅफिनयुक्त पेये पिणे टाळावे. त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, तर औषध विरघळण्याची वेळही वाढते. 

  • मद्यसेवन टाळावे

औषध घेतल्यानंतर अल्कोहोल पिऊ नये. अशी अनेक औषधे आहेत जी अल्कोहोलवरचे सेवन केल्यावर विपरित परिणाम करतात. त्यामुळे अंगावर पुरळ आणि खाज येते. यामुळे यकृताचेही गंभीर नुकसान होते. 

Medicine Side Effects
Summer Tips: पंखा अन् कुलर सुद्धा देईल AC सारखी थंड हवा, कुलिंगसाठी ट्राय करा 'समर हॅक'
  • दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे

दूध हे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर मानले जाते. डॉक्टर दूध प्यायला प्रोत्साहन देतात. त्याचबरोबर औषधासोबतच दूध पिण्याबाबत डॉक्टरांचे मत वेगळे आहे. दुधासोबत औषध घेतल्याने परिणाम कमी होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुग्धजन्य पदार्थ औषधांचा प्रभाव कमी करण्याचे काम करतात. 

  • मुलेठी खाणे टाळावे

मुलेठीचे सेवन केल्याने गळा चांगला होतो. तसेच पचनसंस्था सुरलित कार्य करते. पण ओषध घेतल्यानंतर मुलेठीचे सेवन करु नये. यामुळे ओषधाचा परिणाम होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com