Holy Month of Margashirsha: पवित्र मार्गशीर्ष महिन्यात असे ठेवा आचरण; जाणून घ्या शास्त्र काय सांगतं

मार्गशीर्ष महिनाही धार्मिकदृष्टया महत्वाचा मानला गेलाय. या महिन्यात भगवान श्रीविष्णूंची उपासना केली जाते.
Holy Month of Margashirsha
Holy Month of MargashirshaDainik Gomantak
Published on
Updated on

हिंदू कालगणनेनुसार वर्षातील प्रत्येक महिन्याला महत्व आहे. साधारणतः श्रावण महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते. हे चारही महिने धार्मिकदृष्ट्या पवित्र आहेत. त्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिनाही धार्मिकदृष्टया महत्वाचा मानला गेलाय. या महिन्यात भगवान श्रीविष्णूंची उपासना केली जाते. ह्या महिन्यात विष्णूच्या केलेल्या पूजेचे अगणित पुण्य मिळते. तसेच ह्या महिन्यात लक्ष्मीपूजा करून तिच्याकडे श्री प्राप्तीसाठी म्हणजेच धनधान्य मिळकतीसाठी प्रार्थना केली जाते.

Holy Month of Margashirsha
Budhwar Upay: बुधवारी 'या' गोष्टींनी करा गणपतीची पूजा, घरात राहिल सुख-शांती

ह्या महिन्यात रामरक्षास्तोत्र, विष्णुसहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ, भगवतगीता वाचावी. विष्णु भगवान प्रसन्न होवून मनातल्या इच्छा पूर्ण होतात. ह्या महिन्यात जास्तीजास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे. नामाने त्या देवाची शक्ति आपल्या घरात वास करते. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते. कारण देव हां एकच असून प्रत्येक देव विष्णूची रुपे आहेत. ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन, चंपाशष्ठी, दत्तजयंती, गीताजयंती हे सण असतात.

Holy Month of Margashirsha
Sun Rays Treatment: त्वचाविकारांवर 'सूर्यकिरण चिकित्सा' फायदेशीर

ह्या महिन्यात खोटे बोलणे, इतरांची निंदानालस्ती करणे, मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे. अशाने आपण केलेले जेवढे पूजा पाठ फळाला येत नाही. मौन पाळण्याचा प्रयत्न करावा. त्याने मानसिक शांती मिळते. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' ह्या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना, वाईट विचार निघून जातात. त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही. भगवद्गीता वाचतांना त्या श्लोकाची शक्ती माणसाला नवसंजीवनी देते. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com