सर्व देवतांमध्ये, भगवान गणेश ही पूजा केली जाणारी पहिली देवता मानली जाते. बुधवारी संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते. कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमजोर असेल तर बुधवारी काही उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. बुधवारी काही विशेष पूजा सामग्रीसह गणपतीची पूजा केल्याने पूजेचे फळ मिळते आणि घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात. चला जाणून घेऊया गणपतीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
गणपतीच्या (Ganpati Bappa) पूजेत केळीची जोडी जरूर द्यावी, याने बाप्पा प्रसन्न होतो. गणपतीला सर्व फळांमध्ये केळी हे सर्वात आवडते फळ आहे. म्हणूनच श्रीगणेशाच्या पूजेमध्ये केळीची जोडी जरूर अर्पण करावी. यामुळे गणपतीचा आशीर्वाद मिळेल.
हिंदू धर्मात हळदीशिवाय कोणतेही काम शुभ मानले जात नाही. म्हणूनच बुधवारी गणपतीला हळद अर्पण करा. या दिवशी बाप्पाला हळद अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने बाधा दूर होऊन भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि घरात समृद्धी येते.
प्रत्येक पूजेत नारळाचा वापर नक्कीच केला जातो. पुराणात नारळाला लक्ष्मीचे फळ म्हणून वर्णन केले आहे. बुधवारी श्री गणेशाला संपूर्ण नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होतो.
गणपतीला मोदक आणि लाडू खूप आवडतात, त्यामुळे या दोन गोष्टी त्याच्या पूजेत द्यायला हव्यात. श्रीगणेशाला लाडू किंवा मोदक अर्पण केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे मानले जाते.
हिंदू धर्मात सुपारी हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. गणेशाच्या पूजेच्या साहित्यात सुपारीचा समावेश करायला विसरू नका. बाप्पाला सुपारी अर्पण केल्याने घरात आशीर्वाद आणि समृद्धी येते असे म्हणतात.
पुराणानुसार गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे. श्री गणेशाच्या पूजेत दुर्वा समाविष्ट करायला विसरू नका. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.