आंबा फळांचा राजा आहे. जगात कोणी असे नसेल की ज्याला आंबा आवडत नसेल.आंबा खाण्याची मजा ही उन्हाळ्यामध्येच येते. आंबा (Mango) आरोग्यदायी असून त्याची कोय देखील आरोग्यदायी (Healthy) आहे. आंब्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया आंब्याच्या कोयीचे चमत्कारी फायदे कोणते आहेत. (mango seeds amazing benefits)
* हृदयाच्या रुग्णांसाठी -
आंब्याची कोय देखील हृदयविकाराचा (Heart) धोका कमी करण्यास मदत करू शकते. यासाठी आंब्याच्या कोयीची पावडर तयार करून ठेवावी.याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
* जुलाबावर उपयुक्त-
तुम्हाला जर जुलाबाची समस्या असेल तर तुम्ही आंब्याच्या कोयीचे सेवन करू शकता. यासाठी कोयीचे तुकडे वाळवून त्यांची पावडर तयार करावी आणि पाण्याबरोबर घ्यावे.
* वजन कमी करण्यासाठी -
आंब्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पोषक घटक भरपूर असतात. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आंब्याची पावडर फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही.
* कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते -
आंब्याची कोय कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आंब्याच्या कोयीची पावडर खराब कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी कमी करण्यास मदत करते.
* मजबूत दातांसाठी -
आंब्याच्या फोडी सकाळ संध्याकाळ दातावर घासल्याने दात मजबूत होतात. याशिवाय दातांमधून येणार रक्त देखील कमी होते.
* मासिक पाळीमध्ये फायदेशीर -
महिलांना मासिक पाळीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना खूप रक्तस्त्राव होतो. या काळात आंब्याच्या कोटीची पावडर या समस्यांवर फायदेशीर ठरू शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.