National Mango Day: दरवर्षी 22 जुलै रोजी राष्ट्रीय आंबा दिन साजरा केला जातो. आंबा हा फळांचा राजा मानला जातो. कारण तो चवीला चांगला असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
आंब्याबद्दल अनेकदा लोक विचार करतात की ते खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आंबा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
आंब्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. एक कप चिरलेल्या आंब्यामध्ये 99 कॅलरीज, 1.4 ग्रॅम प्रथिने, 25 ग्रॅम कार्ब, 22.5 ग्रॅम साखर, 2.6 ग्रॅम फायबर, 67% व्हिटॅमिन सी, 18% फोलेट, 10% व्हिटॅमिन ए आणि 10% व्हिटॅमिन ई असते. याशिवाय यामध्ये कॅल्शियम, झिंक, लोह आणि मॅग्नेशियम काही प्रमाणात असते.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स
कोणत्याही अन्नाचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम ग्लायसेमिक इंडेक्स (GI) रँकद्वारे ओळखला जातो. हे 0-100 च्या प्रमाणात मोजले जाते. 55 पेक्षा कमी रँक असलेले कोणतेही अन्न या प्रमाणात कमी साखर मानले जाते. हे पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी योग्य मानले जातात. आंब्याचा जीआय रँक 51 आहे, म्हणजे मधुमेही रुग्णही तो खाऊ शकतात. ,
वजन कमी करण्यासाठी आंब्याचे सेवन कसे करावे
आंब्याचा सेवन कमी करा
आंब्यामध्ये (Mango) मायक्रोन्युट्रिएंट्स आणि फायबर भरलेले असतात. तुम्ही वजन कमी (Weight Loss) करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही तुम्ही ते खाऊ शकता. परंतु ते मर्यादित प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने आरोग्यावर (Health) खूप वाईट परिणाम होतो.
जेवणानंतर खाऊ नका
आंबा जेवणानंतर कधीही खाऊ नये. कारण यामुळे तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जाऊ शकतात. आंबा नेहमी दुपारी खावा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्नॅक म्हणूनही आंब्याचं सेवन करू शकता.
स्नॅक्स म्हणून खा
जर तुम्ही एक वाटी आंबा स्नॅक्स म्हणून खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आंब्यामध्ये आहारातील (Diet) फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय आंबा एनर्जी बूस्टर म्हणूनही काम करतो. प्री-वर्कआउट फूड म्हणून आंबा खाणे खूप फायदेशीर ठरते.
आंब्यांचा रस न खाता तसाच खावा
आंब्याचा रस किंवा मँगो शेक बनवण्याऐवजी आहे तसा खावा. रस बनवल्याने आंब्यातील सर्व फायबर नष्ट होतात.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.