Independence Day 2023: सौंदर्यातून देशप्रेमाची झलक! स्वातंत्र्यदिनी असा करा परफेक्ट मेकअप

जर तुम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त परफेक्ट मेकअप करायचा असेल तर तुम्ही या टिप्स वापरू शकता.
Independence Day 2023
Independence Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Makeup Tips For Independence Day 2023: दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्रदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त तुम्हाला हटके लूक करायचा असेल तर पुढिल टिप्स वापरू शकता.

स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. पण महिलांबद्दल बोलायचे झाले तर या दिवशी महिला केवळ तिरंगा कपडेच घालत नाहीत तर त्याप्रमाणे मेकअप देखील करतात. परफेक्ट लूकसाठी तुम्ही असा मेकअप करू शकता.

  • आय मेकअप

जर तुम्हाला स्वातंत्र्यदिनी काही तरी हटके करायचे असेल तर तुम्ही तिरंग्याच्या रंगाप्रमाणे केशरी, पांढरा आणि हिरवा रंग वापरून डोळ्यांचा मेकअप करू शकता. यामुळे तुमच्या डोळ्याचे सौंदर्य अजून खुलून दिसेल.

Eye Makeup
Eye MakeupDainik Gomantak
Independence Day 2023
Tricolor Vegetable: आरोग्याचे रहस्य भाज्याच्या रंगात; जाणून घ्या फायदे

नेल आर्ट

नेल आर्टचा सध्या प्रचंड ट्रेड आहे. तुम्ही या खास दिवशी तिरंगा वापरून घरच्या घरी नेल आर्ट करू शकता.तुम्ही नखांवर केशरी, पांढरा आणि हिरवा रंग लावून सुंदर डिझाइन तयार करू शकता.

nail art
nail artDainik Gomamtak
  • तिरंगा मेकअप

तुम्हाला जर सगळ्यापेक्षा हटके लूक करायचा असेल तर तुम्ही तिरंगा स्टाईल मेकअप करू शकता. यासाठी तुम्ही डोळ्यांना केशरी रंगाचे आयशॅडो, पांढऱ्या रंगाची टिकली आणि हिरव्या रंगाचे ब्लश वापरू शकता.

Makeup
Makeup Dainik Gomamtak
  • तिरंगा हायलाईट

सध्या मार्केटमध्ये अनेक रंगांचे हायलाइटर मिळतात. तुम्हाला हवे असल्यास, डोळे आणि ओठांव्यतिरिक्त, तुम्ही गालावर तिरंगा हायलाइटर करू शकता. हा लूक देखील तुम्हाला हटके बनवण्यात मदत करेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com